शेतातील नुकसानीचे सरसकट पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:19 IST2021-09-21T04:19:19+5:302021-09-21T04:19:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे ममुराबाद व परिसरातील शेतांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. ...

Make a comprehensive inquiry into the damage to the field | शेतातील नुकसानीचे सरसकट पंचनामे करा

शेतातील नुकसानीचे सरसकट पंचनामे करा

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद : गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे ममुराबाद व परिसरातील शेतांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत. नुकसानीची रक्कम म्हणून एकरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मिळावेत, अशी मागणी ममुराबाद ग्रामपंचायतीतर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले की, ऑगस्टच्या सुरूवातीपासून ते आजपर्यंत अतिवृष्टी तथा ढगफुटीसारखा पाऊस झाला असून, ममुराबाद गाव व परिसरातील संपूर्ण उदीद, मुंग, सोयाबीन व कपाशीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतातील नुकसानीचे सरसकट पंचनामे करून एकरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना जनार्दन कोळी, सरपंच हेमंत चौधरी, महेश चौधरी, गोपाळ मोरे, राजेंद्र शिंदे, अमर पाटील, अनिस पटेल, शैलेश पाटील, संतोष कोळी, नासिर शेख, विलास शिंदे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Make a comprehensive inquiry into the damage to the field