शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अवकाळी पावसामुळे लिंबू बागांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 22:40 IST

पारोळा तालुक्यात विविध ठिकाणी पाऊस पडून झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडले आहेत तर काही ठिकाणी घरावरचे छप्पर उडून गेले आहे.

ठळक मुद्देघरावरचे छप्पर उडाले, झाडे उन्मळली

लोकमत न्यूज नेटवर्क

पारोळा :  महाळपूर ता. पारोळा येथे वादळी पावसामुळे   ३ ते ४  घरांवर झाडे कोसळली. शिवाय  दोन घरांचे छतावरील पत्रे उडून गेले.  एवढेच नाही तर  म्हशींच्या गोठ्यांवरील पत्र उडाल्याने नुकसान झाले. गावात एक मोठे झाड  इलेक्ट्रीक तारांवर पडले. 

महाळपूर येथे वादळात साहेबराव भिल, पीरण सौंदणे, विलास पाटील , सुनिल पाटील, संजय  पारधी, ईश्वर पारधी, संजय भिल, राजेंद्र भिल, भिकुबाई पाटील, रवींद्र पाटील, विनोद पाटील, मधुकर वाल्हे , कैलास पाटील, गिरीश पाटील, धर्मेंद्र पाटील, महादेव मंदिर, कैलास पाटील, विशाल पाटील या ग्रामस्थांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

सरपंच सुधाकर पाटील यांनी लगेच नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून तहसीलदार अनिल गवांदे यांना वादळात नुकसान झाल्याची माहिती देत नुकसानीचा पंचनामे करण्याची विनंती केली. तामसवाडी , देवगाव, जोगलखेडे, मुंदाणे , उडणी दिगर, टोळी,यासह अन्य गावातील लिंबू या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळामुळे झाडावरील लिंबू तर गळून पडले. वादळामुळे अनेक लिंबू चे अनेक झाडे उन्मळून पडले आहेत.

दळवेल येथे नेटशेडचे मोठे नुकसान

दळवेल गावाला नेटशेड चे लाखो रुपयांचे नुकसान यात झाले. यात  शेतकरी  उज्जनबाई अभिमन पाटील व अभिमन नामदेव पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे या नेटशेड चे नुकसान झाले आहे.

वीजेचे खांबासह झाडे उन्मळली

पारोळा तालुक्यात दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास मुसळधार बेमोसमी पावसाने वादळा  विजांच्या कडकडाटासह अर्धा तास हजेरी लावली. चौफेर या वादळी पावसाने हजेरी लावली. भोलाने, शेवगे बु., टोळी, या गावात वादळ खूप जोरात होते. पिंप्री प्र. उ., खोलसर, वंजारी, दळवेल, विचखेडे,  जोगलखेडे, भोकरबारी यासह अन्य भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या वादळामुळे पारोळा कजगाव रोडवर झाड पडल्याने वाहतूक काही वेळ थांबली होती तर तामसवाडी देवगाव रस्त्यावरही झाड  आडवे पडल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली होती.

टॅग्स :JalgaonजळगावParolaपारोळाRainपाऊस