छत्तीसगडच्या तरुणीशी जामनेरच्या मजनूची ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:22 IST2021-08-18T04:22:42+5:302021-08-18T04:22:42+5:30
जामनेर : छत्तीसगडमधून अपहरण करून आणलेल्या अल्पवयीन तरुणीस प्रियकरासोबत पोलिसांनी पळासखेडे काकर (ता. जामनेर) येथून ताब्यात घेतले. छत्तीसगडमधील अल्पवयीन ...

छत्तीसगडच्या तरुणीशी जामनेरच्या मजनूची ओळख
जामनेर : छत्तीसगडमधून अपहरण करून आणलेल्या अल्पवयीन तरुणीस प्रियकरासोबत पोलिसांनी पळासखेडे काकर (ता. जामनेर) येथून ताब्यात घेतले.
छत्तीसगडमधील अल्पवयीन तरुणीशी फेसबुकच्या माध्यमातून प्रेम जुळल्याने तालुक्यातील तरुणाने त्या तरुणीस पळवून आणले व लग्न केले. दोन महिन्याच्या सुखी संसारानंतर छत्तीसगड पोलीसांनी सोमवारी ताब्यात घेतले.
घर सोडताना तरुणी अल्पवयीन असल्याने तिच्या पालकानी अपहरणाची तक्रार कानखेर रायपूर (छत्तीसगड) पोलिसात जूनमध्ये दिली होती. अपहरण करून परतलेल्या तरुणाने तिच्याशी बुलडाणा येथे विवाह केला.
तिचा तपास करणाऱ्या पोलीस पथकास ती जामनेर तालुक्यात असल्याची माहिती मिळाल्याने सहायक निरीक्षक विमल भट्टी, राजेश मंदावी, लंकेश्वर मोरे व अंजना खुजूर यांनी जामनेर पोलिसांशी संपर्क साधला.
निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मदतीने त्या दोघांना पळासखेडे काकर (ता. जामनेर) येथून ताब्यात घेतले. तरुणीला हिंदी व मराठी बोलता येत नाही, तरीही ती दोन महिने कशी सासरी राहिली, याचे कुतूहल पोलिसांना देखील होते. प्रेमाला भाषा व प्रातांचे बंधन अडवू शकत नाही, हेच या घटनेतून दिसून आल्याची चर्चा होती.