खर्डी येथे आगीत लाखाचा मका खाक

By Admin | Updated: April 14, 2017 00:24 IST2017-04-14T00:24:51+5:302017-04-14T00:24:51+5:30

अडावद : शॉर्ट सर्किटमुळे आग लागून एक हेक्टर क्षेत्रातील मका जळून खाक झाला.

Maize flour of lark in the fire at Khardi | खर्डी येथे आगीत लाखाचा मका खाक

खर्डी येथे आगीत लाखाचा मका खाक

अडावद  : शॉर्ट सर्किटमुळे आग लागून एक हेक्टर क्षेत्रातील मका जळून खाक झाला. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास खर्डी येथील शेतीशिवारात घडली. यात शेतक:याचे एक लाख पाच हजारांचे नुकसान झाले आहे.
खर्डी येथील दिलीप मगन पाटील यांचे खर्डी शिवारातील धुपामाय रस्त्यालगत  गट नं.11/1 मधील शेतात सुमारे एक हेक्टर क्षेत्रावरील कापून ठेवलेल्या मक्यास आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येते. यात 100 क्विंटल मका चा:यासह जळून खाक झाला.
आगीचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. शेतकरी दिलीप पाटील यांच्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वीच मका कापून ठेवलेला होता. शेताच्या बांधावरील इलेक्ट्रिक तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.
 पंचकचे तलाठी जी.व्ही.पावरा यांनी पंचनामा केला. तसेच धानो:याचे वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता मनोज मोरे, पंकज बाविस्कर, योगेश कोळी, राकेश पाटील आदींनी नुकसानीची पहाणी केली.                            (वार्ताहर)

Web Title: Maize flour of lark in the fire at Khardi