शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महिंदळे परिसरात अवकाळी पाऊस़, वादळाने पिके झाली आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 15:15 IST

महिंदळे परिसरात बुधवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला.

ठळक मुद्देफुलोऱ्यावर असलेली बाजरी, ज्वारी, गहू, हरबरा दादर, पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

लोकमत न्यूज नेटवर्क

महिंदळे ता. भडगाव : महिंदळे परिसरात बुधवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेली पिके जमीनदोस्त झाली. या पावसाने फुलोऱ्यावर असलेली बाजरी, ज्वारी, गहू, हरबरा दादर, पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे हरभरा पिक पूर्ण वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पावसाळ्यात कपाशीला बोन्ड अळीने खाल्ले आता रब्बीला अवकाळीचा दणका बसला आहे. यावर्षीचा हंगाम शेतकऱ्यांना तोट्याचा ठरत आहे. पावसाळ्यात मेहनतीने शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून कपाशी फुलवली. अगोदर जास्त पाऊस झाल्यामुळे कपाशी पिक पार वाया गेले. जे शिल्लक होते त्यातही बोन्ड अळीचा कहर त्यामुळे कपाशीचे उत्पन्न निम्यावर येऊन ठेपले. पिकासाठी केलेला खर्चही निघाला नाही. कपाशीवर बोन्ड आली पडल्यामुळे डिसेंबर ते जानेवारीपर्यंत चालणारी कपाशी यावर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यातच उपटून फेकावी लागली. विहिरींना बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दादर, बाजरी, मका, गहू, हरबरा, टरबूज, ज्वारी पिकांची लागवड केली आहे. परंतु निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर बसत आहे. कधी वातावरण बदलाचा फटका पिकांना बसतो तर कधी अवकाळीचा मार निसर्गचक्रात मात्र शेतकरी पूर्ण अडकला आहे.  

अवेळी आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आणले आहे. फुलोऱ्यात असलेली पिके जमिनीवर आडवी झाल्याचे पाहून शेतकऱ्यांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली. एकाच रात्रीत होत्याचे नव्हते झाले.

 

टॅग्स :JalgaonजळगावBhadgaon भडगावRainपाऊस