शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रानडुकरांची शिकार करणारा महेंद्र झाला क्रूरकर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 17:12 IST

रावेर हत्याकांड : पिडीतेचा भाऊ राहूल आक्रमक झाल्याने चौघांचा केला खातमा

रावेर : तालुक्यातील केऱ्हाळे बुद्रूक  शिवारातील खेडी भागात वास्तव्यास असलेला आरोपी महेंद्र सीताराम बारेला हा त्या शिवारात बऱ्याचदा रानडुकरांची  शिकार करून गावात मांसविक्रीचा व्यवसाय करीत होता. त्यामुळे ‘मैने सालों को मार डाला..!’ असे बडबडणाऱ्या महेंद्र  याने रक्ताचे माखलेले हात धुतले तरी केऱ्हाळे बुद्रूक येथील सफाई कामगाराला त्याचे गांभीर्य न वाटल्याची बाब समोर आली. तथापि, जंगलात रानडुकरांची शिकार करून मांसाहारासाठी कत्तल करतांना  क्रूरकर्मा महेंद्रच्या रक्तरंजित नजरेत चक्क चौघाही बालहत्याकांडाचे क्रौर्य फिके पडल्याची बाब मानवतेला काळिमा  फासणारी ठरली आहे. मध्य प्रदेशातील झिरन्या येथील ४० ते ५० वर्षांपासून शेतमजुरी व रखवालदारीच्या माध्यमातून रावेर व केऱ्हाळे परिसरात सीताराम बारेला हे त्यांच्या वाडवडिलांपासून स्थलांतरित झाले आहेत. दरम्यान, सीताराम बारेला हे रावेर शिवारातील अनिल पाटील यांच्या शेतात रखवाली करीत असल्याने त्यांचा वाडा व बोरखेडा रस्त्यालगतच्या शेख मुस्तफा यांच्या शेतातील महेताबसिंग गुलाबसिंग भिलाला यांचा वाडा काही अंतरावर आहे. त्यामुळे बारेला व भिलाला या पावरा पोटजाती वेगळ्या असल्या तरी कर्म हेच धर्म मानून त्यांच्या परस्पर कुटुंबांची ओळख व परिचय होता. परिणामतः पीडितेचा मोठा भाऊ संजय, लहान भाऊ राहुल यांच्याशी त्याच परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या गुड्ड्या व सुनील या सख्या चुलतभावांसह आरोपी महेंद्र सीताराम बारेला व त्याचा धाकटा भाऊ मुकेश याच्याशीही मैत्री होती. एव्हाना, या सर्वांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे असल्याने त्यांची पारिवारिक ओळखही चांगल्याप्रकारे होती.       दरम्यान महेताब भिलाला व रूमलीबाई हे दाम्पत्य मोठा मुलगा संजय याला खरगोन जिल्ह्यातील गढी ता भगवानपुरा येथे चुलत नातवाच्या उत्तरक्रियेसाठी गेल्याने व परतताना मार्गावर असलेल्या पलाशा येथील मेहुणीकडे मुक्कामी राहिल्याने त्यांची १४ व ५ वर्षीय दोन्ही मुली तर ११ व ९ वर्षीय दोन्ही मुले एकटेच मुक्कामी होते.  यावेळी पीडितेचा मोठा भाऊ संजयशी मित्र गुड्ड्याचे बोलणे झाल्याने ते तिघेही बापबेटे तिकडे मुक्कामी असल्याची खात्री झाल्याने गुड्ड्या व त्याचा चुलतभाऊ सुनील तथा त्यांचा मित्र मुकेश यांच्यात पीडित मुलगी तिच्या भावंडांसह एकटीच असल्याची चर्चा झाली. त्याची भनक महेंद्र बारेलाला रावेरच्या घरी आल्यावर धाकटा भाऊ मुक्याकडून लागली.      म्हणून त्याने पीडितेचा ११ वर्षीय भाऊ राहुल याला सोबत घेऊन शहरातून देशी दारूची क्वार्टर आणून बऱ्हाणपूर  रस्त्यावरील एका ढाब्यावर रिचवून पीडितेचे घर गाठले.महेंद्रच्या डोक्यात वासनांधतेचे भूत थैमान घालत असल्याने त्याने ११ वर्षीय राहुलला दारूच्या नशेत चूर करून आपला मार्ग सुकर केला.  दरम्यान महेंद्र आत घरात घुसून पीडितेवर अत्याचार करीत असताना तिचा भाऊ राहुलचे घरात घुसताच नशा उतरून डोळे उघडल्याने त्याने थेट आक्रमक होऊन घरातील कऱ्हाड आरोपी महेंद्रवर उपसली असावी. मात्र शरीराने धष्टपुष्ट असलेल्या महेंद्रने दारूच्या नशेत आधीच चूर केलेल्या राहुलचा तोल जाताच त्याच्या हातातील कुऱ्हाडीने त्याच्यावर व त्यांच्या पाठोपाठ त्याच्याशी प्रतिकारशक्ती झोंबाझोंबी करणाऱ्या चौघांची जणूकाही जंगलातील रानडुकरांची शिकार करावी याप्रमाणे क्रूरकर्मा महेंद्रने चौघाही बालकांच्या मानेवर घाव घालून क्रूर हत्या केली, असा  कयास सूत्रांनी व्यक्त केला आहे. आता ९ दिवसांच्या पोलीस कोठडीतील तपासात त्याबाबतचा घटनाक्रम निष्पन्न होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 ऊस तोडणीसाठी महेंद्र गेला असता तर... मध्यप्रदेशातील इटारसी येथील साखर कारखानदारीसाठी संबंधित ठेकेदारांकडून आरोपी महेंद्र व त्याचा ताडदेव रस्त्यावरील आतेभावाने प्रत्येकी १५ - १५ हजार रूपये ठेकेदाराकडून घेत ठेकेदाराला गुंगारा दिला. तथापि, तो सोबतच्या ऊसतोड कामगारांसोबत मध्यप्रदेशात गेला असता तर कामाच्या व्यस्ततेत हे वासनांधतेचे भूत महेंद्रच्या हैवानी डोक्यात नाचले नसते.! असे मत त्याच्या दोन्ही काकांनी बोलून दाखवले.