शहरं
Join us  
Trending Stories
1
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

विनोद चांदणे प्रकरणात शेळगावचा महेंद्र राजपूत मास्टरमाइंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:00 IST

घटनेत वापरण्यात आलेली कार शेळगाव येथून जप्त

पहूर, ता. जामनेर : ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे यांच्या खून प्रकरणात ‘मास्टर माईंड तळेगाव, ता. जामनेर येथील महेंद्र राजपूत हा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून आरोपींची संख्या आता सहावर पोहचली आहे. दरम्यान, विनोद चांदणे यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घटनेत वापरण्यात आलेली कार पोलिसांनी शेळगाव येथून जप्त केली आहे.विनोद चांदणे यांचे १९ मार्च रोजी अपहरण करून खून करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार प्रदीप परदेशी नसून तळेगावचा महेंद्र असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अनेक धक्कादायक रहस्य बाहेर येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणात अटकेत असलेल्या चंद्रशेखर वाणी, महेंद्र राजपूत, विनोद देशमुख व नामदार तडवी यांची १ एप्रिल रोजी पोलीस कोठडी संपत आहे.पडद्यामागील सूत्रधार प्रदीपच्या अटकेनंतर निष्पन्नया प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून प्रदीप संतोष परदेशी, रा. डांभूर्णी ता.पाचोरा याचे नाव महेंद्र राजपूतकडून तपासात निष्पन्न झाले. प्रदीप हाच मुख्य सुत्रधार असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते. ३०मार्च रोजी परदेशी नाशिकमध्ये असल्याचे समजताच सापळा रचून पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, पोलीस कर्मचारी अनिल देवरे व दिनेश मारवळ यांनी रात्री ताब्यात घेऊन पहूर पोलीस स्टेशनमध्ये रविवारी पहाटे हजर करून पूर्ण तपासाअंती अटक केली. तसेच तपासादरम्यान योगेश श्रावण सोनार, रा. नगरखाना. जामनेर याचे नाव समोर आले आहे. यालाही पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली आहे. विशेष म्हणजे घटनेचा मूख्य सुत्रधार प्रदीप नसून महेंद्र राजपूत असल्याचा गौप्यस्फोट खुद्द प्रदीपने पोलीस तपासात केला आहे. तपासात पुन्हा काही जणांचे नाव समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घटनेतील बडा मासा गळाला लागण्यासाठी पोलीस तपासात गोपनियता बाळगत असल्याचे सांगितले आहे. घटनेच्या मागचे ठोस कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.तीन दिवसांपासून मागावरमास्टरमाईंड महेंद्र राजपूत याने प्रदीप परदेशी, योगेश सोनार यांना फोन लावून तीन दिवस अगोदर बोलावून घेतले होते. ते १६ मार्च पासून विनोदच्या मागावर होते. १९ रोजी विनोद घरून निघाल्यानंतर महेंद्रची चारचाकी विनोदच्या दुचाकीला आडवी लावून सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास तिघांनी विनोदला वाकडी धरणाच्या भिंतीजवळ नेले व लोखंडी रॉडने डोक्यावर वार केले. त्यानंतर पाचोरा तालुक्यातील मोहाडी धरणाच्या जवळ असलेल्या रमेश रामसिंग पाटील यांच्या शेतातील विहिरी जवळ दुपारी दीड वाजेच्या सुमारास विनोदला गंभीर अवस्थेत आणून त्याला पुन्हा बेदम मारहाण करून खून केल्याचे माहिती समोर आली. हात-पाय बांधून व दोन दगड बांधून मृतदेह विहिरीत टाकून व घटनास्थळावरून पळ काढला, अशीही माहिती प्रदीपच्या अटकेनंतर तपासात समजली. महेंद्र हा मुळचा कासमपुरा येथील रहिवासी असून प्रदीप परदेशी याच्याशी त्याची जुनी ओळख आहे. त्यामुळे दहा दिवसानंतर मुख्य सुत्रधार महेंद्र राजपूत असल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनाही त्याने तपासात चकवा दिला आहे.दोषींना पाठबळ देऊ नयेवाकडीतील घटना अतीशय निंदनीय असून जातीय वादाला खतपाणी घालण्याचे काम सुरू असून स्थानिक राजकीय नेत्याने दोषींना पाठबळ देऊ नये. वारंवार मागासवर्गीय समाजावर अन्याय होत असल्याने राज्यस्तरावर येत्या काळात आंदोलन उभारू तसेच पीडित कुंटुबाला कोणताही आधार नसल्याने शासनाने त्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी मागणी अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी चांदणे कुटुंबाचे सांत्वन करून पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करताना केली.नागरी हक्क सरंक्षण आयुक्तांची भेटनागरी हक्क सरंक्षण नाशिकचे आयुक्त विजय मगरे यांनी चांदणे कुटुंबाची व पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने शासनाच्या निकषांनुसार तीन टप्प्यात आर्थिक मदत पीडित कुंटुबाला भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.घटना स्थळी महेंद्र राजपूत कडून माहितीडीवाय.एसपी ईश्वर कातकडे यांनी मुख्य सुत्रधार महेंद्र राजपूत याला रविवारी वाकडी धरणाच्या जवळील घटनास्थळी नेऊन अधिक माहिती जाणून घेतली आहे. तसेच डोक्यावर वार केलेला लोखंडी रॉळ धरणात फेकल्याची कबुली महेंद्रने दिलीे. त्यादृष्टीने धरणावर जावून पाहणी करणार असून लोखंडी रॉड ताब्यात घेणार असल्याचे सांगण्यात आले.गोदामातून कार जप्तमृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आलेली कार पोलिसांनी महेंद्र राजपूत याच्या शेळगावातील घरी जावून गोदामामधून जप्त केलीे. कारमध्ये पडलेल्या विनोदच्या रक्ताचे नमुने फॉरेंन्सिक लॅबच्या पथकाने घेतले.

टॅग्स :Jalgaonजळगाव