महेंद्र महाजन यांना पीएच.डी.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:24 IST2020-12-05T04:24:26+5:302020-12-05T04:24:26+5:30
——- बसेसमध्ये गर्दी पारोळा : रेल्वेच्या गाड्या फारशा धावत नसल्यामुळे बसेसमध्ये वाढती गर्दी दिसत आहे. बस प्रशासनाने हे लक्षात ...

महेंद्र महाजन यांना पीएच.डी.
——-
बसेसमध्ये गर्दी
पारोळा : रेल्वेच्या गाड्या फारशा धावत नसल्यामुळे बसेसमध्ये वाढती गर्दी दिसत आहे. बस प्रशासनाने हे लक्षात घेऊन बसेसची संख्या मुख्य मार्गांवर वाढविण्याची गरज आहे. मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव अशा बसेसची संख्या वाढवली जावी, अशी मागणी प्रवासीवर्गाकडून केली जात आहे.
——
गटारी तयार करण्याची मागणी
भुसावळ : शहरातील विविध भागात नागरी सुविधांचा अद्यापही अभाव आहे. खडका चौफुलीजवळील आयान काॅलनी, जिया काॅलनी भागात अद्यापही गटारींची कामे झालेली नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असते. वाहने येता-जाताना हे पाणी नागरिकांच्या अंगावर उडून वाद होत असतात. गटारींची कामे करण्याची मागणी होत आहे.
——-
वाळू चोरी सुरूच
जळगाव : गिरणा पात्रातून वाळू चोरीचे प्रमाण वाढते आहे. तालुक्यातील निमखेडी शिवारातून मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, डंपर वाळू घेऊन धावत असतात. नजीकच्या शेतांमधून काही ही वाहने रस्त्यावर येतात. याची गंभीर दखल घेतली जावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात असून, चोरी न थांबल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.