पाचोऱ्यात महाविक्रम ७८५३ नागरिकांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:23 IST2021-09-16T04:23:18+5:302021-09-16T04:23:18+5:30
आमदार किशोर पाटील यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने या लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. शिवतीर्थ पटांगण, ड्रीम ...

पाचोऱ्यात महाविक्रम ७८५३ नागरिकांना लस
आमदार किशोर पाटील यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने या लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. शिवतीर्थ पटांगण, ड्रीम सिटी भागातील ओपन स्पेस, तसेच एमआयडीसी कॉलनी परिसर,राजीव गांधी कॉलनी, गणपती मंदिर ओपन स्पेस, संघवी कॉलनी, तसेच झुलेलाल मंदिर परिसर अशा सहा ठिकाणी महालसीकारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सुमित किशोर पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर,आदित्य बिल्दीकर ,प्रवीण ब्राह्मणे यांनी पाहणी केली. यशस्वीतेसाठी माजी उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील,माजी उपजिल्हा प्रमुख ॲड. दिनकर देवरे, पप्पू राजपूत, बापू हटकर, नगरसेवक राम केसवानी, नगरसेवक शीतल सोमवंशी, गजेंद्र पाटील, योगेश पाथरवट, सागर पाटील, अनिल राजपूत, नितीन चौधरी आदींनी परिश्रम घेतले.