शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जळगाव जिल्ह्यातील तीन रुग्णालयांमधील ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 12:16 IST

एक रुग्णालय स्वत: योजनेतून पडले बाहेर

ठळक मुद्देएक रुग्णालय बंद तर एकाची जागा बदलल्याने पुन्हा प्रक्रिया

जळगाव : रुग्णांच्या विविध प्रकारच्या तपासण्या, उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी दीड लाख रुपयांचा विमा लाभ देण्याच्या उद्देशाने सुरू असलेली ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ जळगाव जिल्ह्यातील तीन रुग्णालयांमध्ये बंद झाली आहे. यात गणपती हॉस्पिटल स्वत:हून या योजनेतून बाहेर पडले आहे तर भुसावळ येथील कोणार्क हॉस्पिटल बंद करण्यात आले असून इण्डो अमेरिकन हॉस्पिटलची जागा बदलल्याने तेथे ही योजना पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.२०१२ मध्ये राज्य सरकारने नागरिकांना आरोग्याशी संबंधित ९७१ प्रकारच्या तपासण्या, उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी दीड लाख रुपयांपर्यंतचा विमा लाभ देण्याच्या उद्देशाने जनआरोग्य योजना सुरू केली. या योजनेला वेगवेगळे नाव देण्यात आले. सध्या ही योजना ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ या नावाने सुरू आहे. या ‘कॅशलेस’ विमा योजनेंतर्गत गरजू रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी विविध जिल्ह्यांतील काही रुग्णालये संलग्न करण्यात आले.संलग्न रुग्णालयांनी २५ टक्के खाटा (बेड्स) या योजनेतील रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक असतानाही काही रुग्णालयांनी त्या ठिकाणी अन्य रुग्णांना ठेवल्याची तक्रारी आल्याने राज्यातील अनेक रुग्णालयांना या योजनेतून वगळण्यात आले असल्याचे माहिती समोर आली.या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील स्थिती जाणून घेतली असता जिल्ह्यातील तीन रुग्णालयांमध्ये ही योजना बंद आहे. मात्र यात जळगाव शहरातील गणपती हॉस्पिटल स्वत:हून बाहेर पडल्याची माहिती मिळाली. या बाबत डॉ. शीतल ओस्वाल यांनी सांगितले की, रुग्णालयात इतर योजना सुरू असून प्रत्येक योजनांमधील रुग्णांची वाढती संख्या पाहता आपण स्वत:हून रितसर पत्र देऊन महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून बाहेर पडलो आहे.या शिवाय जळगावातील इंडो अमेरिकन हॉस्पिटलची जागा बदलली असून नवीन जागेत ही योजना सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विकास बोरोले यांनी सांगितले. यासाठी लेखा परीक्षणही झाले असून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर अखेर अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात योजना पुन्हा सुरू होणार असल्याचेही डॉ. बोरोले म्हणाले.भुसावळ येथील कोणार्क हॉस्पिटलचाही यात समावेश असून हे हॉस्पिटल बंद करण्यात आले असल्याची माहिती डॉ. विकास बोरोले यांनी दिली.विमा कंपन्यांशी असतो रुग्णालयांचा करारसंबंधित योजनेत संलग्न असलेल्या रुग्णालयांचा सरकारशी करार नसतो तर तो विमा कंपनीशी असतो. त्यामुळे कोणत्या रुग्णालयांना योजनेतून वगळले किंवा कायम ठेवले या बाबत सरकार पत्रक अथवा आदेश काढू शकत नाही, अशी माहिती मिळाली. इतकेच नव्हे याबाबत सर्व प्रक्रिया मुंबई येथून होते, जिल्हा स्तरावर केवळ योजनेचे समन्वयक असतात.रुग्णालयात इतर योजना सुरू असून प्रत्येक योजनांमधील रुग्णांची वाढती संख्या पाहता आपण स्वत:हून रितसर पत्र देऊन महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून बाहेर पडलो आहे.- डॉ. शीतल ओस्वाल, गणपती हॉस्पिटल.इंडो अमेरिकन हॉस्पिटलची जागा बदलली असून नवीन जागेत ही योजना सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू असून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर अखेर अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात योजना पुन्हा सुरू होईल. तसेच कोणार्क हॉस्पिटल बंद करण्यात आले आहे.- डॉ. विकास बोरोले, व्यवस्थापकीय संचालक, इंडो अमेरिकन हॉस्पिटलमहात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची सर्व प्रक्रिया मुंबई येथून होते. योजनेतून कोणत्या रुग्णालयांना वगळले अथवा योजना बंद केली या बाबत सरकार पत्रक अथवा आदेश काढत नाही.- चेतन पाटील, समन्वयक, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव