कबड्डी स्पर्धेत महर्षी वाल्मिक क्रीडा संघाने पटकाविले पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:19 IST2021-01-19T04:19:26+5:302021-01-19T04:19:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन जळगावच्या मान्यतेने महर्षी वाल्मिक क्रीडा फाउंडेशन आयोजित एकदिवसीय ५५ किलो ...

कबड्डी स्पर्धेत महर्षी वाल्मिक क्रीडा संघाने पटकाविले पारितोषिक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन जळगावच्या मान्यतेने महर्षी वाल्मिक क्रीडा फाउंडेशन आयोजित एकदिवसीय ५५ किलो वजनी गट कबड्डी स्पर्धा नुकतीच पार पडली.
ही स्पर्धा जुना आसोदा रस्यावरील गुरुदत्त कॉलनी येथे घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन महापौर भारती सोनवणे व उपमहापौर सुनील खडके व नगरसेवक कैलास सोनवणे व भरत सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर स्पर्धा पार पडली.
असे आहेत विजयी संघ
कबड्डी स्पर्धेमध्ये महर्षी वाल्मिक क्रीडा फाउंडेशनच्या संघाने बाजी मारली. या संघाला भरत सपकाळे यांच्याहस्ते प्रथम पारितोषिक देण्यात आले. तर क्रीडा प्रबोधिनी एरंडोल हा संघ उपविजयी ठरला. या संघाला नगरसेवक शरद तायडे यांच्याहस्ते पारितोषिक देण्यात आले. तसेच तृतीय पारितोषिक नेताजी सुभाष क्रीडा मंडळ जळगाव यांना पटकाविला.
उत्कृष्ट कामगिरी
उत्कृष्ट चढाई- तेजस जैन
उत्कृष्ट पकड-गोविंद महाजन
अष्टपैलू खेळाळू- कल्पेश पाटील.