महाराष्ट्र सदनातील अधिकाऱ्याच्या पत्नीची दागिन्यांची पर्स लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 00:48 IST2019-11-16T00:48:06+5:302019-11-16T00:48:10+5:30

अडीच लाखांचा ऐवज असलेली पर्स चोरट्यांनी लांबविल्याची घटना १२ रोजी रात्री जळगावातील मानराज पार्कजवळील श्रीराम मंदिर संस्थानच्या मैदानावर घडली.

 Maharashtra House Officer's wife loses jewelry purse | महाराष्ट्र सदनातील अधिकाऱ्याच्या पत्नीची दागिन्यांची पर्स लंपास

महाराष्ट्र सदनातील अधिकाऱ्याच्या पत्नीची दागिन्यांची पर्स लंपास

जळगाव- दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील सहाय्यक लेखाधिकारी नीलेश केदारे यांच्या पत्नी माधुरी केदारे यांची अडीच लाखांचा ऐवज असलेली पर्स चोरट्यांनी लांबविल्याची घटना १२ रोजी रात्री जळगावातील मानराज पार्कजवळील श्रीराम मंदिर संस्थानच्या मैदानावर घडली. दिराच्या लग्नासाठी त्या जळगावात आल्या होत्या.
माधुरी यांचे दीर नुपेश यांचे मानराज पार्कनजीकच्या मैदानावर १२ रोजी सायंकाळी लग्न होते. लग्नासाठी त्यांनी सोन्याचे काही दागिने खरेदी केले होते. दागिने असलेली पर्स त्यांएनी मंडपातील खुर्चीखाली ठेवली. काही वेळाने पर्स बघितली असता तिथून ती गायब झालेली दिसली. त्यांनी दुसºया दिवशी रामानंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पर्समध्ये ९० हजार रुपये किमतीचे ३० ग्रॅमचे झुमके, ९० हजार रुपये किंमतीचा ३० ग्रॅमचा नेकलेस, ३० हजार रुपयांची १० ग्रॅम पोत, २० हजाराचे ४ ग्रॅमचे मंगळसूत्र व १६ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ४७ हजाराचा ऐवज होता.

Web Title:  Maharashtra House Officer's wife loses jewelry purse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.