शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरांवरील कारवाईच्या मुद्यावर मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यात खडाजंगी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 13:53 IST

जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि  गुलाबराव पाटील यांच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळीच रविवारी खटके उडाले.

जळगाव - जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेदवारांविरुद्ध भाजपचे बंडखोर उमेदवार उभे असल्याने त्यांच्यावरील कारवाईच्या मुद्यावरून जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि  गुलाबराव पाटील यांच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळीच रविवारी खटके उडाले. याबाबत गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली. 

जिल्ह्यात शिवसेनेचे चार उमेदवार रिंगणात आहेत. या चारही ठिकाणी भाजपचे चार बंडखोर उभे आहेत. याबद्दल आपणास पंतप्रधान मोदी यांच्यासमोर व्यथा मांडण्याची संधी मिळावी, असे गुलाबराव पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना सांगितले, मात्र तसे करता येणार नाही, असे महाजन यांनी सांगितल्याने दोघांमध्ये सभास्थळीच जोरदार वाद झाला.

जिल्ह्यात शिवसेनेचे चार उमेदवार उभे आहेत. या चारही ठिकाणी भाजपचे बंडखोर उभे आहेत. त्यात जळगाव ग्रामीण मतदार संघात  स्वत: गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध भाजपचे बंडखोर चंद्रशेखर अत्तरदे, चोपड्यातील शिवसेनेच्या उमेदवार लता सोनवणे यांच्याविरुद्ध भाजपाचे जि.प.तील सभापती प्रभाकर सोनवणे, पाचोरा येथे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्याविरुद्ध भाजपचे बंडखोर अमोल शिंदे हे रिंगणात आहेत. तर पारोळ्यात शिवसेनेचे चिमणराव पाटील यांच्याविरुद्ध भाजपचे बंडखोर गोविंद शिरोळे हे रिंगणात आहेत. त्यामुळे या चारही ठिकाणी शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे उपनेते गुलाबराव पाटील यांनी थेट मोदी यांच्याकडेच व्यथा मांडण्याची परवानगी मागितली. त्यावरुन हा वाद झाल्याची माहिती आहे. 

दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी सांगितले की,  भाजपने बंडखोर उमेदवारांवर कारवाई करावी, असे पत्र स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे दिले आहे. तरीही कारवाई होत नाही. युतीसाठी हे  योग्य नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाGirish Mahajanगिरीश महाजन