शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

संकटमोचकांची स्वकीयाशीच लढत; सलग सहा विजयानंतर गिरीश महाजन पुन्हा निवडणुकीला सामोरे

By चुडामण.बोरसे | Updated: October 31, 2024 13:51 IST

महाजन यांची राज्यात पक्षाचे संकटमोचक अशी ओळख आहे.

जळगाव : जामनेर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे नेते, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन सातव्यांदा निवडणूक लढवित आहेत. यंदा महाविकास आघाडीने त्यांच्याविरोधात पारंपरिक विरोधकांना बाजूला सारुन भाजपमधून राष्ट्रवादी (शरद पवार गट) आलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांना उमेदवारी दिली आहे. 

महाजन यांची राज्यात पक्षाचे संकटमोचक अशी ओळख आहे. सन १९९५ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार ईश्वरलाल जैन यांचा पराभव केला. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.  त्यानंतर ईश्वरलाल जैन यांचा दुसऱ्यांदा तर याशिवाय संजय गरुड, माजी नगराध्यक्ष राजू बोहरा,  डिगंबर पाटील यांचा पराभव करीत महाजन विजयाची डबल हॅटट्रीक साजरी करून आता सातव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत.

विरोधकांना भाजपमध्ये घेण्याची खेळी- गिरीश महाजन यांनी यावेळी वेगळी खेळी खेळली. त्यांनी आपल्याकडे विरोधकांना भाजपमध्ये घेत विरोधी पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केला.- गेल्यावेळी त्यांच्या विरोधात निवडणूक लढलेले संजय गरूड हे आता राष्ट्रवादीऐवजी भाजपमध्ये आहेत. असे असताना ज्यांना एकेकाळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनवले त्या दिलीप खोडपे यांनी भाजपची  साथ सोडून राष्ट्रवादीत (शरद पवार गट) प्रवेश केला आणि महाजनांविरोधात उमेदवारीही मिळवली आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचेलक्ष आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे- विविध खात्याचे मंत्री म्हणून महाजन यांनी मतदारसंघात भरीव निधी आणला. - शेतीमालाला भाव, औद्योगिक विकास या मुद्यांचा विरोधकांकडून वापर केला जात आहे. तर- याउलट ३० वर्षात केलेल्या विकास कामांच्या बळावर सत्ताधारी प्रचार करीत आहे.

लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रक्षा खडसे विजयी झाल्या. त्यांना जामनेर विधानसभा मतदारसंघात ३६ हजार मतांची आघाडी मिळाली होती.

२०१९ मध्ये काय घडले ?गिरीश महाजन  (विजयी)    १,१४,७१४संजय गरुड     राष्ट्रवादी                  ७९,७००भीमराव चव्हाण    वंचित बहुजन आघाडी    ६,४७१नोटा    -    २,१०५

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते      २०१४    गिरीश महाजन    भाजप    १०३४९८२००९    गिरीश महाजन     भाजप    ८९०४०२००४    गिरीश महाजन    भाजप    ७१८१३१९९९    गिरीश महाजन    भाजप    ५६४१६

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकjamner-acजामनेरGirish Mahajanगिरीश महाजन