रातोरात बसविलेला महाराणा प्रताप यांचा पुतळा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:20 IST2021-07-07T04:20:14+5:302021-07-07T04:20:14+5:30

शहरातील वसंत टॉकीजजवळ असलेल्या चौकात क्रांतिसूर्य महाराणा प्रताप चबुतरा बसविण्यात आला आहे. या ठिकाणी सोमवारी रात्री दीड ...

Maharana Pratap's statue confiscated during the night | रातोरात बसविलेला महाराणा प्रताप यांचा पुतळा जप्त

रातोरात बसविलेला महाराणा प्रताप यांचा पुतळा जप्त

शहरातील वसंत टॉकीजजवळ असलेल्या चौकात क्रांतिसूर्य महाराणा प्रताप चबुतरा बसविण्यात आला आहे. या ठिकाणी सोमवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास दोन तरुणांनी महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवून त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याने एकच खळबळ उडाली. पुतळा स्थापन केल्याची माहिती मिळताच या ठिकाणी समाजबांधवांनी रात्री गर्दी केली होती. पोलिसांनीदेखील घटनास्थळी धाव घेत समाजबांधवांना समजूत घालून पुतळा काढण्याचे आवाहन केले. यावेळी पोलिसांनी पुतळा ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात आकाश पाटील व अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू हे करीत आहेत.

Web Title: Maharana Pratap's statue confiscated during the night