भुसावळ येथे महाराजा अग्रसेन जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 18:30 IST2019-09-29T18:29:26+5:302019-09-29T18:30:45+5:30

श्री राधाकृष्ण प्रभातफेरी परिवारातर्फे रविवारी महाराजा अग्रसेन जयंती साजरी करण्यात आली.

Maharaja Agarsen's birth anniversary celebrated at Bhusawal | भुसावळ येथे महाराजा अग्रसेन जयंती साजरी

भुसावळ येथे महाराजा अग्रसेन जयंती साजरी

ठळक मुद्देश्री राधाकृष्ण प्रभातफेरी परिवारातील सदस्यांचा सहभागआरती व भजनाने आदरांजली

भुसावळ, जि.जळगाव : येथे श्रीराधाकृष्ण प्रभातफेरी परिवारातर्फे रविवारी महाराजा अग्रसेन जयंती साजरी करण्यात आली.
सकाळी अष्टभूजादेवी मंदिरापासून व्यंकटेश बालाजी मंदिर मार्गे प्रभातफेरी काढून पांडुरंग टॉकीजसमोरील महाराजा अग्रसेन चौकात श्री राधाकृष्ण प्रभातफेरी परिवारातील सदस्यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. आरती व भजन करण्यात आले. यावेळी राधेश्याम लाहोटी, श्याम अग्रवाल, संजय अग्रवाल, प्रकाश अग्रवाल, सुनील लाहोटी, लीलाधर अग्रवाल, जी.आर.ठाकूर, संगीता अग्रवाल, कल्पना टेमाणी, प्रिया अग्रवाल, राज भराडिया, कृष्णा भराडिया आदी उपस्थित होते.

Web Title: Maharaja Agarsen's birth anniversary celebrated at Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.