शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

5 वर्षात जो विकास केलाय तो जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी महाजनादेश यात्रा काढली - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 14:46 IST

मराठा आरक्षण आजपर्यंत कोणी दिले नाही, ते या युती शासनाने दिले. पाच वर्षात ४० लाख परिवाराला बचत गटांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिले

जळगाव - पंधरा वर्षात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जो विकास केला नाही तो पाच वर्षात भाजपच्या सरकारने सर्व क्षेत्रात साधला आणि जो विकास साधला तो जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपने महाजनादेश यात्रा काढली. पुढे हाऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मला तसेच पालकमंत्री गिरीश महाजन आणि नगराध्यक्ष करण पाटील यांना आशिर्वाद द्यावा असे आहवान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

पारोळा -अमळनेर रोडवर खुल्या पटांगणावर शुक्रवारी दुपारी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधताना त्यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी ते म्हणाले की, पारोळा शहराला नव्याने बोरी धरणातून पिण्याचे पाण्याचे आरक्षण दिले. शहराला पाणी अपूर्ण पडू दिले जाणार नाही. शेतकरी कर्जमाफी दिली. मराठा आरक्षण आजपर्यंत कोणी दिले नाही, ते या युती शासनाने दिले. पाच वर्षात ४० लाख परिवाराला बचत गटांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिले असून जनता ही दैवत आहे, अशी भावना व्यक्त करणत नव्याने भाजपाला जनादेश द्याल का असा प्रश्न विचारीत पुन्हा आम्हला आशिर्वाद द्या असे आवाह केले.

या वेळी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील नगराध्यक्ष करण पाटील, आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वला पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील , शिक्षण सभापती पोपट भोळे, माजी जि. प .अध्यक्ष अशोक कांडेलकर, सभापती नंदू महाजन, सुरेंद्र बोहरा, अ‍ॅड. अतुल मोरे , महनोर महाजन, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब पाटील ,सभापती अंजली पवार, दीपक अनुष्ठान , पंचायत समिती सदस्य सुजाता पाटील, वर्षा पाटील, पी. जी .पाटील,  संजय पाटील, राजेंद्र पाटील, गटनेते बापू महाजन यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. शैलेश पाटील यांनी केले.

जोरदार स्वागतपारोळ्यात प्रवेश करताना मोंढले प्र. अ. येथे स्वागत करण्यात आले. तसेच पारोळा जलशुद्धीकरण केंद्रा जवळून फडणवीस यांच्या स्वागताला ५०० मोटार सायकल भव्य रॅली काढण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण दिल्याने समाजाच्या   व नगर परिषद च्या वतीने नगराध्यक्ष करण पाटील यांनी स्वागत केले.बालाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा कडेला उभे राहून संस्थेचे अध्यक्ष यु. एच. करोडपती, मुख्याध्यापक हेमंत पाटील, विजय बडगुजर आदींनी मुख्यमंत्री  फडणवीस यांचे फुगे व फुले उधळून स्वागत केले. माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी फटकांच्या आतीषबाजी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा