योग वेदांत समितीतर्फे चांगल्या पावसासाठी महायज्ञ

By Admin | Updated: May 21, 2017 13:58 IST2017-05-21T13:58:28+5:302017-05-21T13:58:28+5:30

जळगावातील कार्यक्रमाला देशभरातील 500 पेक्षा जास्त भाविकांची उपस्थिती.

Maha Yajna for good rains by Yog Vedant Samiti | योग वेदांत समितीतर्फे चांगल्या पावसासाठी महायज्ञ

योग वेदांत समितीतर्फे चांगल्या पावसासाठी महायज्ञ

 जळगाव,दि.21- देशभरातील शेतक:यांना कोणत्याही अडचणी येवू नये व यावर्षी देखील चांगला पाऊस व्हावा, यासाठी योग वेदांत सेवा समितीतर्फे रविवारी निवृत्तीनगर परिसरातील आसाराम बापू आश्रम या ठिकाणी 108 कुंडीय महायज्ञाचे आयोजन करण्यात आले.

सकाळी 7.30 वाजेपासून या यज्ञ सोहळ्याला सुरुवात झाली. महाराष्ट्रासह सुरत, अहमदाबाद, इंदौर या शहरांमधून सुमारे 500 पेक्षा जास्त भाविक या सोहळ्यात सहभागी झाले. महायज्ञासाठी हरिव्दार येथून आलेले पंडित अरविंद व आदित्य पंडित यांच्यासह 108 पुरोहित महायज्ञात सहभागी झाले. 

Web Title: Maha Yajna for good rains by Yog Vedant Samiti