राजमोहीत अवैध दारूचा महापूर

By Admin | Updated: January 4, 2016 00:33 IST2016-01-04T00:33:21+5:302016-01-04T00:33:21+5:30

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील मोठी राजमोहीत दोन वेगवेगळ्या छाप्यात तब्बल 43 लाख रुपयांचा दारूचा साठा जप्त करण्यात आला.

Magnificent ammunition of rajmohammad | राजमोहीत अवैध दारूचा महापूर

राजमोहीत अवैध दारूचा महापूर

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील मोठी राजमोहीत दोन वेगवेगळ्या छाप्यात तब्बल 43 लाख रुपयांचा दारूचा साठा जप्त करण्यात आला. शिवाय चोरीचे दहा लाखांचे एमसीलदेखील जप्त करण्यात आले.

राजमोहीत मोठय़ा प्रमाणावर अवैध दारूसाठा लपविल्याची माहिती मिळाल्यावर अक्कलकुवा पोलिसांनी धाडसत्र राबविले. त्यात अब्दुल हासीम अब्दुल सत्तार मक्राणी यांच्या घरातून तीन लाख 43 हजारांचे विदेशी मद्य तर सलाउद्दीन नूरमोहमंद मक्राणी यांच्या घरातून 40 लाखांची विदेशी दारू जप्त करण्यात आली. पहिल्या धाडीत दहा लाखांचे चोरीचे एमसीलदेखील आढळून आले आहे.

या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक महेश घुर्ये, अपर अधीक्षक अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद घाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Magnificent ammunition of rajmohammad