मध्यप्रदेशातील तरुणाची जळगावात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 13:18 IST2017-09-20T13:17:01+5:302017-09-20T13:18:20+5:30
गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

मध्यप्रदेशातील तरुणाची जळगावात आत्महत्या
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 20 - जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीमधील वाहन चालक संजय मांगीलाल राठोड (वय 35 मुळ रा.खुईखारवा, ता.खरगोन मध्यप्रदेश) या तरुणाने खान्देश सेंट्रल आवारातील झुडपात निंबाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, संजय राठोड हा सुप्रीम कॉलनीत पांडे किराणाजवळ प}ी, दोन मुले,भाऊ व आई यांच्यासोबत वास्तव्याला होता. खान्देश सेंट्रल आवारात बांधकाम सुरु आहे. त्या ठिकाणी काम करणारे मजुर गोविंदा लहु सोनवणे, पंकज पुंडलिक पाटील, समाधान नथ्थू डोळे व रवींद्र हिलाल गोपाळ (सर्व रा.बिलवाडी, ता.जळगाव) हे कामाच्या ठिकाणी जात असताना झुडपात निंबाच्या झाडाला एक जण गळफास घेतल्याचे त्यांच्या नजरेस पडले. या मजुरांनी लागलीच ही घटना बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या दिनेश पाटील यांना सांगितली. त्यांनी शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. सहायक निरीक्षक आशीष रोही, दुष्यंत खैरनार व सहका:यांनी घटनास्थळ गाठले.
पोलिसांनी मयताचे खिसे तपासले असता वरच्या खिशात आधारकार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड व किरकोळ पैसे होते. आधारकार्डवरील नाव व पत्यावरुन राठोडची ओळख पटली. जागेवरच पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळ व रुग्णालयात धाव घेतली.