बांबरूड राणीचे सरपंचपदी मधुकर वाघ बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 21:18 IST2020-01-19T21:18:16+5:302020-01-19T21:18:33+5:30
बांबरुड राणीचे, ता.पाचोरा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मधुकर ओंकार वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

बांबरूड राणीचे सरपंचपदी मधुकर वाघ बिनविरोध
सामनेर, ता.पाचोरा, जि.जळगाव : बांबरुड राणीचे, ता.पाचोरा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मधुकर ओंकार वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
राजेंद्र ओंकार वाघ यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांची एकमताने निवड करण्यात आली. माजी आमदार दिलीप वाघ यांनी नवनिर्वाचित सरपंच मधुकर वाघ यांचा सत्कार केला. यावेळी पी.टी. सी.चेअरमन व पाचोरा पालिका गटनेते संजय वाघ, दगाजी वाघ, पं. स. गटनेते ललित वाघ, संग्राम आढाव, मधू कोलते, पिंटू दारकोंडे, राजू गव्हाडे, जरीफ तडवी, करीम तडवी, नाना पाटील, प्रफुल्ल वाघ, अनिल जावळे, सुधाकर वाघ, मधु गव्हाडे, मुराद तडवी, प्रकाश चौधरी, राहुल वाघ, प्रदीप वाघ, मनोज वाघ, अक्षय चव्हाण, भगवान डाबरे, आबा पवार, विष्णू ठाकरे, शिंदे गुरुजी, मुस्लीम पंच कमिटी, तडवी पंच कमिटी व ग्रामस्थ उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी म्हणून मोरे व ग्रामविकास अधिकारी नंदकुमार पाटील यांनी काम पाहिले.