एम. के. स्पोर्ट्स जेपीएल ७ चा विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:21 IST2020-12-30T04:21:07+5:302020-12-30T04:21:07+5:30

क्रिकेट स्पर्धा : अंतिम सामन्यात किंग्स इलेव्हनचा पराभव लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील सागर पार्कवर झालेल्या ...

M. K. Winner of Sports JPL 7 | एम. के. स्पोर्ट्स जेपीएल ७ चा विजेता

एम. के. स्पोर्ट्स जेपीएल ७ चा विजेता

क्रिकेट स्पर्धा : अंतिम सामन्यात किंग्स इलेव्हनचा पराभव

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील सागर पार्कवर झालेल्या ''''जेपीएल ७'''' क्रिक्रेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी एम. के. स्पोर्ट्स संघाने किंग्स इलेव्हनचा पराभव करून जेपीएल ७ चे जेतेपद पटकाविले.

जितो जळगाव चॅप्टर व श्री जैन युवा फोंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जैन प्रीमिअर लीग या क्रिकेट स्पर्धा सागर पार्क येथे पार पडल्या. यात १८ संघ सहभागी झाले होते. पहिल्या उपांत्य सामन्यात किंग्स इलेव्हन संघाने मारवाड संघाचा दहा गडी राखून पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात एम. के. स्पोर्ट्सने मास्टर ब्लास्टर या संघाला ३७ धावांनी नमविले. यासह अंतिम सामना एम. के. स्पोर्टसने ३ चेंडू राखून जिंकला. मॅन ऑफ द सिरीज तनेश जैन, उत्कृष्ट गोलंदाज अमोल श्रीश्रीमाळ, उत्कृष्ट फलंदाज तनेश जैन, उत्कृष्ट यष्टीरक्षक नीलेश चोरडिया यांना गौरवण्यात आले.

मुख्य प्रायोजक अजय ललवाणी, सुमित मुथा होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पारस राका, महेंद्र रायसोनी, महेंद्र कोठारी, कनकमल राका, सुनील श्रीश्रीमाळ, सुरेश टाटिया, श्री जैन युवा फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश ललवाणी, जितो सचिव दर्शन टाटिया, रितेश पगारिया, प्रविण पगारिया, मनोज लोढा, प्रवीण छाजेड, सचिन राका, तेजस कावडिया, आनंद चांदीवाल, पीयूष संघवी, अमोल फुलफगर, सौरभ कोठारी, पारस कुचेरिया, प्रणव मेहता, अनिल सिसोदिया, संदीप सुराणा, सुशील छाजेड, रिकेश गांधी, यतीन राका, हितेश पारख, नीरज सेठिया, शैलेश कटारिया, चंद्रशेखर राका, गौरव पानगरिया, मनीष लुंगिया, प्रितेश चोरडिया, दिनेश बाफना, रितेश छोरिया आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: M. K. Winner of Sports JPL 7