शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कांद्याला कमी भाव, चाळीसगावला शेतकऱ्यांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 21:07 IST

लिलाव रोखले

चाळीसगाव, जळगाव : इतर बाजार समित्यांमध्ये कांद्याला चांगला भाव मिळत असताना चाळीसगाव बाजार समितीत व्यापाºयांनी भाव पाडले, असा रोष व्यक्त करीत कांदा उत्पादकांसह रयत सेनेने बुधवारी दुपारी १२ वाजता चाळीसगाव - नागद मार्गावरची वाहतूक रोखून धरत दोन तास रास्तारोको आंदोलन केले. शेतकºयांची समजूत काढल्यानंतर दुपारी तीन वाजता लिलाव पूर्ववत झाले. यामुळे चाळीसगाव - नागद मार्गावर वाहनांच्या लागल्या होत्या.बाजार समितीत बुधवारी कांद्याची आवक चांगली झाली होती. एकुण २७५ वाहनांमधून उत्पादकांनी कांदा विक्रीस आणला होता. मार्केटच्या बाहेर लहान वाहनांमधून आणलेल्या कांद्याचे लिलाव दुपारी सुरु झाले. मात्र भाव मिळत नसल्याने शेतकºयांनी चाळीसगाव - नागद मार्गावर ठिय्या देत आंदोलन सुरु केले. यावेळी रयत सेनेच्या गणेश पवार यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलनात सहभाग घेतला.आंदोलन चिघळू नये म्हणून बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक प्रदीप देशमुख, उपसभापती महेंद्र पाटील, अ‍ॅड. रोहिदास पाटील, सचिव अशोक पाटील यांनी आंदोलनकर्त्या शेतकºयांची समजूत काढली. रयत सेनेच्या पदाधिकाºयांशीही त्यांनी चर्चा करुन आंदोलन थांबविले.राज्यातील लासलगाव, मनमाड, नांदगाव, उमराणे आदी बाजार समित्यांमध्ये कांद्याला साडे आठशे रुपये प्रति क्विंटलच्या पुढे भाव दिला जात आहे. मात्र चाळीसगाव बाजार समितीत फक्त साडे तीनशे ते साडेपाचशे रुपये प्रति क्विंटल दराने कांदा व्यापारी खरेदी करत असल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत बाजार समिती सभापती व प्रशासनाशी वेळोवेळी संपर्क साधुन तक्रारी केल्या असल्या तरी भाव ‘जैसे थे’च असल्याने बुधवारी शेतकºयांचा उद्रेक झाला, असे रयत सेनेचे म्हणणे होते. आंदोलनाने उग्र रुप धारण करु नये म्हणून पोलिसांनाही बोलविण्यात आले. इतर बाजार समित्यांप्रमाणे भाव मिळावा. अशी प्रमुख मागणी शेतकºयांची होती. आंदोलनात अनिल मराठे, विवेक शिंदे , मुकुंद पवार, संतोष पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते व शिंदी येथील शेतकरी अनिल जाधव, उमेश राठोड, हेमंत राठोड, रघुनाथ चव्हाण, लक्ष्मण दाभाडे तसेच तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे व सहकाºयांनी बदोबस्त ठेवला होता.

कांदा उत्पादकांनी आम्हाला बोलवल्यानंतर आंदोलनात भाग घेतला. बाजार समितीचे संचालक व व्यवस्थापनाशी चर्चा करुन शेतकºयांना ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळवून दिला. प्रतिक्विंटल मागे शेतकºयांचा साडे तीनशे रुपयांचा फायदा झाला आहे.- गणेश पवार, अध्यक्ष, रयत सेना, चाळीसगावलिलावात सुरुवातील कमी दर्जाच्या कांद्याचा समावेश होता. बुधवारी झालेल्या लिलावात इतर बाजार समित्यांप्रमाणेच भाव दिला. शेतकºयांशी चर्चा केली. मुख्य लिलावात चांगले भाव दिले गेले. संचालकांनीही शेतकºयांशी चर्चा केली.- अशोक पाटील, प्र.सचीव, बाजार समिती, चाळीसगाव.

टॅग्स :onionकांदाJalgaonजळगाव