शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

प्रेमीयुगुलाचे विषप्राशन, ‘तिचा’ मृत्यू तर ‘त्याची’ मृत्यूशी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:44 IST

जामनेर तालुक्यातील रहिवासी

वाकोद, ता. जामनेर - प्रेमप्रकरणातून विषप्राशन करून जामनेर तालुक्यातील प्रेमी युगलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास फर्दापूर, ता.सोयगावनजीक असलेल्या वरखेड तांडा येथील एका शेतात घडली. यातील अश्विनी प्रवीण पाटील (२१, रा.मोयगाव भागदरा, ता.जामनेर) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर दीपक भगवान लोखंडे (२७, रा.मोयगाव भागदरा, ता.जामनेर) हा तरुण गंभीर असून त्याला जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार १० रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास फर्दापूर शिवारातील काळापट्टा परिसरातील दारासिंग चव्हाण यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली प्रेमी युगल विष प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले. या विष़यी माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, पो.ना. सुनील भिवसने व परिसरातील शेतकऱ्यांनी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अश्विनी प्रवीण पाटील हिचा जागीच मृत्यू झालेला होता तर तरुण दीपक भगवान लोखंडे हा गंभीर अवस्थेत बेशुद्ध पडलेला आढळून आला. त्यांच्या बाजूला आढळलेल्या बॅगमधील आधार कार्ड व कागदपत्रांवरुन दोघांची ओळख पटली.पोलिसांनी तातडीने बेशुद्ध अवस्थेतील दीपक लोखंडे यास वैद्यकीय उपचारासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर प्रथोमोपचार करुन त्याला जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. मयत अश्विनी पाटील हिचे सोयगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.प्रेमी युगलाच्या आत्महत्येचे नेमके कारण समजले नसले तरी प्रेम प्रकरणाला विरोध झाल्यामुळेच या प्रेमी युगलाने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती मिळाली.या प्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक शरद जºहाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, पो.ना. सुनील भिवसने हे करीत आहे. दरम्यान, फर्दापूर परिसर हा दिवसेंदिवस सुसाईड पॉइंट होत चालला आहे. कधी अजिंठा घाटात तर कधी परिसरात अशा घटना घडत असतात.पहूर पोलिसात होती हरविल्याची नोंददरम्यान, शिवण क्लासला जाते असे सांगून अश्वीनी ही शनिवारी घरातून बाहेर पडली होती. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंदही करण्यात आली होती.

टॅग्स :Jalgaonजळगाव