शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

काँग्रेस जळगाव जिल्ह्यात फिरविणार भाकरी ?

By अमित महाबळ | Updated: September 5, 2022 16:47 IST

वर्षानुवर्षे पक्षाला साथ देऊनही वरिष्ठांकडून अन्याय झाल्याची भावना माजी पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.

जळगाव : काँग्रेसच्या जिल्हा प्रभारीपदी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांच्या नियुक्तीनंतर संघटनेत मोठ्या बदलांचे संकेत मिळत असून, आगामी निवडणुकांत भाकरी फिरविण्याच्या इरादा ठेवूनच पक्षाने देशमुख यांच्याकडे जळगावचा पदभार सोपविला असल्याचे कळते.

विनायक देशमुख ३२ वर्षे काँग्रेस संघटनेत कार्यरत असून, त्यांनी जिल्हा युवक काँग्रेस व जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदावर काम केले आहे. प्रदेश सरचिटणीसपदाच्या कार्यकाळात त्यांनी धुळे, नंदुरबार, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे प्रभारी म्हणून काम केले आहे. पक्षाच्या निष्ठावंतांमध्ये त्यांची गणना केली जाते. खा. राहुल गांधी यांच्या पदयात्रेचे महाराष्ट्रातील नियोजन त्यांच्याकडे आहे.

बजावली होती मोठी भूमिका२०१६ ते २०१९ या कालावधीत देशमुख यांच्याकडे जळगाव जिल्ह्याची जबाबदारी होती. याच काळात विधानसभा निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विधानसभेला आ. शिरीष चौधरी निवडून आले. त्यांच्यामागे संघटनात्मक ताकद उभी करण्यात देशमुखांची आघाडी होती. मुक्ताईनगरमध्येही ते पक्षाच्या आदेशानुसार सक्रीय होते. नंतरचा इतिहास सगळ्यांनाच ठावूक आहे.

जागा खेचून आणली२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेश पातळीवरील नेते रावेर मतदारसंघाची जागा काँग्रेसला द्यायला इच्छूक नव्हते. विनायक देशमुख यांनी शेवटच्या क्षणापर्यंत पाठपुरावा करून ही जागा पक्षाकडे खेचून आणली होती. देशमुख यांचा जळगाव जिल्ह्याचा चांगला अभ्यास आहे. आता त्यांची पुन्हा जळगावच्या प्रभारीपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीकडे मोठ्या आशेने पाहणारे अनेक जण आहेत.

धाडसी निर्णय घ्यावे लागणारपक्षात संघटनात्मक पातळीवर मतभेद आहेत. वर्षानुवर्षे पक्षाला साथ देऊनही वरिष्ठांकडून अन्याय झाल्याची भावना माजी पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. स्थानिक पातळीवरील निर्णय चुकल्याने गेल्या काही दिवसांत काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा बँकेत आपल्या हक्काच्या जागा गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे देशमुख यांना संघटनेसाठी काही धाडसी निर्णय घ्यावे लागणार आहेत.

ही होती चमकदार कामगिरीदेशमुख यांच्याकडे चार वर्षे जळगाव जिल्हा होता. त्यानंतर एक वर्ष त्यांनी धुळ्यात काम केले. २०२१ मध्ये पक्षाने त्यांच्याकडे सिंधुदुर्ग सोपवले. देशमुखांचा गृह जिल्हा अहमदनगर आहे. तेथून सिंधुदुर्गला जायचे झाल्यास १२ ते १४ तास लागतात. हे अंतर पार करून त्यांनी कुडाळची नगरपंचायत प्रथमच पक्षाला मिळवून दिली. त्यांची याआधीची कामगिरी पाहिल्यास जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला गतवैभव मिळवून देण्याची कामगिरी विनायक देशमुख पार पाडतील का हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव