संक्रांतीच्या पहाटे चोरटय़ांची ‘हॅट्रीक’, जळगाव जिल्ह्यात भुसावळ, किनगाव, धानोरा येथे एटीएम फोडून लाखोंची रक्कम लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 13:38 IST2018-01-14T13:37:54+5:302018-01-14T13:38:07+5:30

संक्रांतीच्या पहाटे चोरटय़ांची ‘हॅट्रीक’, जळगाव जिल्ह्यात भुसावळ, किनगाव, धानोरा येथे एटीएम फोडून लाखोंची रक्कम लांबविली
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 14 - जळगाव जिल्ह्यात भुसावळ, किनगाव (ता. यावल), धानोरा (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास चोरटय़ांनी एटीएम फोडून लाखो रुपयांची रक्कम लंपास केली. संक्रांतीच्या पहाटेच चोरटय़ांनी एटीएम फोडण्याची ‘हॅट्रीक’ केल्याने या घटनेने पोलीस यंत्रणेसह बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
रविवारी पहाटे भुसावळ येथे तीन ते चोरटय़ांनी येऊन गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडले व त्यातील साधारण तीन लाखावर असलेली रक्कम लंपास केली. किनगाव येथेही एवढीच रक्कम असून धानोरा येथील रकम समजू शकली नसली तरी ती लाखातच असल्याचे सांगण्यात येत आहे.