बोदवडला सराफा दुकान फोडून लाखाचे दागिने लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2017 12:37 IST2017-06-29T12:37:06+5:302017-06-29T12:37:06+5:30

चोरटय़ांनी लांबवले लाखाचे दागिने लंपास

Looted jewelery of Bodhwad by breaking a bullion shop | बोदवडला सराफा दुकान फोडून लाखाचे दागिने लांबविले

बोदवडला सराफा दुकान फोडून लाखाचे दागिने लांबविले

ऑनलाईन लोकमत

बोदवड,दि.29 - शहरातील वर्दळीच्या मुख्य रस्त्यावरील गांधी चौकातील मदन ज्वेलर्समधून चोरटय़ांनी मध्यरात्री सुमारे एक लाख रुपये सोने व चांदीचे दागिने लांबवल़े गुरुवारी सकाळी सराफा व्यापारी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याची बाब उघड झाली.
गांधी चौकात विजय जैन (कर्नावट) यांचे मदन ज्वेलर्स दुकान आह़े बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे जैन दुकान बंद करून गेल्यानंतर गुरुवारी सकाळी 10 वाजता त्यांनी दुकान उघडले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आल़े चोरटय़ांनी ेजि़प़शाळेच्या मागील बाजूला असलेल्या दुकानाचे चॅनल गेट तोडले व दुकानाची भिंत तोडून आत प्रवेश केला़ 30 हजार रुपये किंमतीचे 10 ग्रॅम सोन्याचे दागिने, 60 हजार रुपये किंमतीची सुमारे दीड किलो चांदी तसेच 20 हजारांचे बेन्टेक्स दागिने चोरटय़ांनी लांबवले. रिकामे बॉक्स दुकानातच फेकल़े चोरीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. 

Web Title: Looted jewelery of Bodhwad by breaking a bullion shop