केळी कापणीत ‘सूट’द्वारे लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:23 IST2021-06-16T04:23:14+5:302021-06-16T04:23:14+5:30

केऱ्हाळे, ता. रावेर : गत महिनाभरापासून केली उत्पादक शेतकऱ्यांवरचे अस्मानी संकट काही अंशी टळले असतानाच ...

Loot by ‘suit’ in banana harvest | केळी कापणीत ‘सूट’द्वारे लूट

केळी कापणीत ‘सूट’द्वारे लूट

केऱ्हाळे, ता. रावेर : गत महिनाभरापासून केली उत्पादक शेतकऱ्यांवरचे अस्मानी संकट काही अंशी टळले असतानाच आता केळी कापणीनंतर सूट देण्याच्या सुलतानी संकटाने केळी उत्पादक शेतकरी हताश झाले आहेत. ही सूटद्वारे होणारी लूट थांबणे गरजेचे असून याकरिता शेतकरी प्रयत्न करीत आहेत.

एकेकाळी केळीच्या घडांची कापणी झाल्यानंतर निव्वळ केळीचे घड ट्रकमध्ये भरले जायचे. त्यामुळे केळी घडाच्या आतील दंड्याचे अतिरिक्त वजन असल्याचा टेंभा मिरवत व्यापाऱ्यांनी सूटच्या नावाखाली तीन टक्के वजन कमी करण्याची अनोखी शक्कल लढवली होती. त्यालाही शेतकऱ्यांनी संमती दर्शवत प्रति क्विंटलला तीन टक्के सूट देण्याचे मान्य केले होते. म्हणजे शंभर क्विंटल मालाला तीन क्विंटल माल शेतकऱ्यांकडून व्यापारी फुकटात नेत आहे . मात्र आता शहरांमध्ये घडाच्या आतील दांड्याची घाण होऊन बाहेर फेकण्याचा त्रास वाचावा याकरीता काळानुरूप शहरातील व्यापाऱ्यांनी मालाच्या आवक पध्दतीत बदल घडवून आणला आहे. संपूर्ण घडाऐवजी फण्या करून प्लॅस्टिक कॅरेटमध्ये किंवा कागदी खोक्यात माल शेतामधूनच साफ करून पाण्यात धुऊन नेला जात आहेत. त्यामुळे घडासोबत असलेला दांडा व घडाच्या फण्या करीत असताना अतिरिक्त केळीची होणारी तूट शेतातच पडून राहते. कामाच्या प्रवाहात घडातील चांगली केळीही तोडून फेकली जात असते. यामुळे जास्त प्रमाणात नुकसान होत असून तोटा सहन करावा लागत असतो. म्हणून सूट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

याकरिता केळीचे घड भरून नेणाऱ्या व्यापाऱ्यांच्या व्यतिरिक्त फण्या करून व कॅरेटमध्ये माल भरणाऱ्या गाडीला तीन टक्के दिली जाणारी सूट कोणत्याही स्थितीत दिली जाऊ नये याकरिता लढा देण्याच्या तयारीत आहे.

Web Title: Loot by ‘suit’ in banana harvest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.