लसीकरणासंदर्भात ढिसाळ नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST2021-07-01T04:13:11+5:302021-07-01T04:13:11+5:30
कर्मचारीदेखील लसीकरण करण्यास टाळाटाळ करत असून नागरिकांना या ठिकाणी प्रचंड प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. आठ दिवस बैठक ...

लसीकरणासंदर्भात ढिसाळ नियोजन
कर्मचारीदेखील लसीकरण करण्यास टाळाटाळ करत असून नागरिकांना या ठिकाणी प्रचंड प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. आठ दिवस बैठक करूनदेखील नागरिकांना लस मिळत नाही. वारंवार प्रशासनाकडे लसीकरण केंद्रावरील नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
याबाबत वैद्यकीय अधिकारी किरण पाटील यांना नियोजन सरळ पद्धतीने करण्यात यावे, अशा सूचना तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दिल्या आहेत.
तहसीलदार नितीनकुमार देवरे
धरणगाव
लसीकरण करण्याबाबत धरणगाव ग्रामीण रुग्णालयात वारंवार तक्रारी केल्या असून याकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करण्यात येईल.
-कैलास माळी
लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गेल्यावर आठ-आठ दिवस लसच मिळत नाही. त्या ठिकाणी असलेले कर्मचारी मोबाइलमध्ये व्यस्त असतात. लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांना व्यवस्थित उत्तर दिले जात नाही.
-धीरेंद्र पुरभे