नजर पैसेवारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:17 IST2021-09-18T04:17:34+5:302021-09-18T04:17:34+5:30
चोपडा : नजर पैसेवारीमध्ये शेतकऱ्यांना मारणारे धोरण दिसत असल्याने ते बदल करावे व केळी उत्पादक शेतकऱ्यांची कायदेशीर होणारी लूट ...

नजर पैसेवारीत
चोपडा : नजर पैसेवारीमध्ये शेतकऱ्यांना मारणारे धोरण दिसत असल्याने ते बदल करावे व केळी उत्पादक शेतकऱ्यांची कायदेशीर होणारी लूट थांबविण्याची मागणी शेतकरी समितीतर्फे करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांना याबाबत निवेदन देण्यात आले. निवेदन देताना एस. बी.पाटील, अजित पाटील, ॲड.कुलदीप पाटील, चंद्रकांत पाटील,अनिल पाटील आदी उपस्थित होते.
जे.के.पाटील यांचा सत्कार
धरणगाव : राज्य मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जे.के.पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड, जिल्हा संस्थेचे सदस्य पी.ए. पाटील,लीडर ट्रेनर बी. व्ही. पवार, नगरसेविका दीपमाला काळे आदी उपस्थित होते.
सूत्र संचालन संजय बेलोरकर, आभार डी.एस. सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाला नंदिनिबाई शाळेच्या मुख्याध्यापिका चारुलता पाटील, रवींद्र कोळी, भास्कर बोरुडे, संदीप सोनवणे,(भडगाव) कविता पाटील, एस. बी. चौधरी (बहादरपूर), मुख्याध्यापक चौधरी (निंबोला हायस्कूल) यांच्यासह जिल्ह्यातील स्कूटर गाईडर उपस्थित होते.