अवैध वाळू वाहतुकीवर करडी नजर
By Admin | Updated: December 4, 2015 00:47 IST2015-12-04T00:47:44+5:302015-12-04T00:47:44+5:30
यावल/बोदवड : अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची करडी नजर पडली आहे.

अवैध वाळू वाहतुकीवर करडी नजर
यावल/बोदवड : अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची करडी नजर पडली आहे. यावल येथे एक लाख 92 हजार तर बोदवड येथे 73 हजार रुपये दंडाची कारवाई अवैध वाळू वाहतूक करणा:यांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, बोदवडचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी या पुढे अवैध वाळू वाहतूक करताना जे आढळतील त्यांच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. त्यामुळे हा व्यवसाय करणा:यांमध्ये खळबळ उडाली आह़े यावल येथील महसूल विभागाने दोन दिवसात विविध ठिकाणी छापे टाकून 14 वाहनांवर कारवाई केली. त्यांच्याकडून एक लाख 92 हजार 140 रुपये दंड वसूल केला. यावल तहसील विभागाने वाळू माफियांवर धडक मोहीम राबविली आहे. दोन दिवसात विविध ठिकाणी पथकाने छापे टाकून 14 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांना एक लाख 92 हजार 140 रुपये दंड करण्यात आला. याकामी यावल मंडळ अधिकारी, तलाठी, तहसीलदार बामणोद मंडळ अधिकारी तलाठी विरावली व यावल यांनी कारवाई केली. 2 रोजी यावल-चोपडा रस्त्यावर साकळी गावाजवळ तहसीलदार विजयकुमार ढगे व सहकारी यांनी ज्ञानेश्वर दयाराम लोणारी (रा. आंदलवाडी, ता.रावेर) यांचे क्र. एमएच19-ङोड 3901 वाळूचे वाहन जप्त केले. त्यांना 40 हजार 830 रुपये दंड आकारला. 3 रोजी सुकलाल परशुराम परदेशी साकेगाव,ता.भुसावळ यांचे क्र. एमएच 18- सी 7003 वाहन माती वाहून नेताना बोरावल बुद्रूकजवळ पकडले. त्याला 16 हजार 230 रुपये दंड आकारण्यात आला. यावल येथे विकास वाल्मीक सपकाळे (रा.कासवा) यांचे वाहन खडीने भरलेले पकडले.त्याच्यांकडून 23 हजार 730 रुपये दंड वसूल केला. यावल येथे शिवलाल भागवत सपकाळे (रा.पिंप्री) यांचे विना क्रमांकाचे वाहन वाळू वाहून नेताना पकडले. त्यातून 12 हजार 930 रुपये दंड वसूल केला. पाडळसे येथे माती वाहतूक करीत असताना रजनीकांत दत्तात्रय पाटील यांचे वाहन पकडून पाच हजार 430 रुपये दंड करण्यात आला. तर शरद भागवत सपकाळे (रा. भोलाणे, ता.जि. जळगाव) यांचे वाहन क्र.(एमएच 19-एएन 4134) वाळू वाहतूक करीत असताना विरावली गावाजवळ पकडून 12 हजार 930 रुपये दंड केला आहे. गौण खनिज वाहतूकदारांवर वक्रदृष्टी महसूल विभागाने दाखविली असल्याने शासनाच्या महसुलात वाढ होत आहे. मात्र दहीगाव भागात गौण खनिजाची खुलेआम वाहतूक होत असून ही महसूल याकडे पाठ फिरवित आहे. ही खेदाची बाब आहे. तसेच 2 डिसेंबर रोजी आठ वाहनांवर कारवाई करून 80 हजार 60 रुपये दंड केला आहे. दोन दिवसात एकूण एक लाख 92 हजार रुपये दंड वसूल केला. बोदवडला कारवाईचा दंडुका नव्याने रूजू झालेले तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईचा दंडुका उगारला आहे. 2 रोजी रात्री जळगाव येथील मालक छगन कोळी व दुसरे अमित बच्छाव यांची वाहने अवैधरित्या शहरात वाळूजी अवैध वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी रात्रीच दुचाकीने माहितीच्या आधारावर वाहनांचा पाठलाग करीत वाहन पकडले व सकाळी त्यांना तहसीलदार कार्यालयात प्रत्येकी 36 हजार 600 रुपये असा एकूण 73 हजार 200 रुपयाचा दंड ठोठावला. या कारवाईने अवैध वाळू वाहतूकदारासोबत अवैध गौण खनिज वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहे. (लोकमत ब्युरो)