Lok Sabha Election 2019 : लोकमत रिसर्च - रक्षा खडसे यांचा तीन लाखावर मतांचा रेकॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:12 PM2019-04-18T12:12:50+5:302019-04-18T12:13:54+5:30

कृष्णराव पाटलांना होते १ लाख २७ हजाराचे मतधिक्य

Lokmat Research: Defense Khadse voted on three lakh votes | Lok Sabha Election 2019 : लोकमत रिसर्च - रक्षा खडसे यांचा तीन लाखावर मतांचा रेकॉर्ड

Lok Sabha Election 2019 : लोकमत रिसर्च - रक्षा खडसे यांचा तीन लाखावर मतांचा रेकॉर्ड

googlenewsNext

जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघाच्या निर्मितीनंतर व पूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये खासदार रक्षा खडसे यांनी तब्बल तीन लाख १७ हजार ७९३ मतांनी विजयी होण्याचा विक्रम २०१४ मध्ये प्रस्थापित केला आहे. १९७१ मध्ये खासदार कृष्णराव पाटील यांच्या एक लाख २७ हजार ९६९ मतांचा विक्रम त्यांनी मोडीत काढला आहे. या निवडणुकीत विजयाचा हा विक्रम मोडित निघतो की कायम राहतो याबाबत उत्सुकता आहे. १९७१ मध्ये कृष्णराव पाटील यांनी गजाननराव गरुड यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये रक्षा खडसे यांनी मनिष जैन यांचा पराभव केला.
3,17,793 एवढ्या मताधिक्याने खासदार रक्षा खडसे यांनी २०१४ मध्ये विजय मिळाला होता. त्यावेळी त्यांना ६,०५,०६४ मते मिळाली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे मनिष जैन उभे होते आणि त्यांना २,८७,२७१ मते मिळाली होती. खडसे यांचा हा रेकॉर्ड कायम आहेत.

कोणाला किती होते मताधिक्य
वर्ष          नाव           मताधिक्य
1952 शिवराम राणे    68326
1957 भरुचा कुरेसेटजी 24702
1962 जुलालसिंग पाटील 70385
1967 एस.एस.सामदळी 66081
1971 कृष्णराव पाटील 127969
1977 वाय.एम.बोरोले 12186
1980 वाय.एस.महाजन 96358
1984 वाय.एस.महाजन 54065
1989 यादव शिवराम महाजन 5436
1991 डॉ.गुणवंत सरोदे 23955
1996 डॉ.गुणवंत सरोदे 84087
1998 डॉ.उल्हास पाटील 56814
1999 वाय.जी.महाजन 89795
2004 वाय.जी.महाजन 20646
2007 हरिभाऊ जावळे 25717
2009 हरिभाऊ जावळे 28218
2014 रक्षा खडसे 317793

Web Title: Lokmat Research: Defense Khadse voted on three lakh votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.