‘लोकमत’ दीपोत्सवचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 13:11 IST2018-11-07T13:11:12+5:302018-11-07T13:11:25+5:30
जळगाव : ‘लोकमत’च्या ‘दीपोत्सव-२०१८’चे प्रकाशन बुधवार, ७ रोजी मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम संकुलातील लोकमत शहर कार्यालयात ...

‘लोकमत’ दीपोत्सवचे प्रकाशन
जळगाव : ‘लोकमत’च्या ‘दीपोत्सव-२०१८’चे प्रकाशन बुधवार, ७ रोजी मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम संकुलातील लोकमत शहर कार्यालयात करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसन पाटील, कवी अशोक कोतवाल, प्रकाश किनगावकर उपस्थित होते. स्वागत ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी केले. ‘दीपोत्सव’चा हा १६ वा अंक असून त्यात दरवर्षीप्रमाणे वैविध्यपूर्ण साहित्य समाविष्ट आहे. मागील वर्षी ‘दीपोत्सव’ने २ लाख ३६ हजार खपाचा विक्रमी आकडा गाठला होता. यंदाही या दिवाळी अंकाला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी खात्री या मान्यवरांनी व्यक्त केली.