भाजपा कार्यकत्र्याकडून ‘लोकमत’ची होळी
By Admin | Updated: October 27, 2015 19:27 IST2015-10-27T19:27:12+5:302015-10-27T19:27:12+5:30
खडसेंवरील आरोपाचा निषेध : शहर पोलीस स्टेशनला 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

भाजपा कार्यकत्र्याकडून ‘लोकमत’ची होळी
जळगाव : निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येनंतर महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर होणा:या आरोपाचा निषेध म्हणून भाजपच्या कार्यकत्र्यानी सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता टॉवर चौकात ‘लोकमत’ च्या अंकाची होळी केली. याप्रकरणी 11 जणांविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.}ीने खडसे यांच्यावर आरोप केले होते. यासंदर्भात आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा-मेनन, आमदार डॉ.सतीश पाटील, शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे व शिवराम पाटील यांनी खडसे, सुपेकर व रायते यांच्यावर टीका केली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. खडसे यांचीही बाजू ‘लोकमत’ने मांडली. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होत असलेल्या वृत्तांमुळे खडसेंची बदनामी होत असल्याचा आरोप करीत भाजपाच्या कार्यकत्र्यानी सोमवारी ‘लोकमत’च्या अंकाची होळी केली. सादरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते व सागर चौधरी यांच्या नावांचा उल्लेख, तर सादरेंच्या प