शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

युतीचे ठरले, महाविकास आघाडीचे मात्र ठरेना...

By ajay.patil | Updated: March 13, 2024 11:40 IST

रावेरची जागा भाजपाकडे, मविआमध्ये काँग्रेस की राष्ट्रवादीचा तिढा

अजय पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : जळगाव व रावेर या दोन्ही जागा महायुतीत भाजपकडेच या जागा राहण्याचे निश्चित आहे; मात्र, महाविकास आघाडीमध्ये जळगावच्या जागेचा निर्णय झाला असला, तरी रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा कोणाकडे याबाबतचा अधिकृत निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबतच काँग्रेसनेदेखील या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा महाविकास आघाडीतील पेच कायम आहे.

भाजपकडून इच्छुक 

- रक्षा खडसे

काय आहे जमेच्या बाजू

• सलग दोनवेळा मोठ्या मताधिक्याने विजयौ झाल्या आहेत.• रावेर लोकसभा मतदारसंघात चांगला संपर्क• लेवा समाजासह, गुर्जर समाजाच्या मतदारांवर चांगली पकड

काय आहेत कच्चे दुवे

• सासरे एकनाथ खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये गेल्यामुळे उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह• भाजपातील काही नेत्यांची नाराजी.

- डॉ. केतकी पाटील

काय आहे जमेच्या बाजू

• माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या रुग्णालयाच्या माध्यमातून मतदारसंघात चांगली ओळख• उच्चशिक्षित व युवा चेहरा

काय आहेत कच्चे दुवे

• काही महिन्यांपूर्वीच भाजपामध्ये प्रवेश, त्यामुळे काहीसा विरोधहोण्याची शक्यता• भाजप संघटनेत कामाचा अभाव

- अमोल जावळे

काय आहे जमेच्या बाजू

• नवीन चेहरा, हरिभाऊ जावळे यांच्या माध्यमातून राजकीय पार्श्वभूमी• शेतीविषयक समस्यांची चांगली जाण• जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून चांगले संघटन

काय आहेत कच्चे दुवे

• रावेर, यावल वगळता इतर तालुक्यांमध्ये फारसा संपर्क नाही• हरिभाऊ जावळे यांच्याप्रमाणे मतदारांशी नाळ जोडलेली नाही.• राजकारणाचा केवळ दोन-तीन वर्षाचा अनुभव

मविआतील इच्छुक 

- एकनाथ खडसे

काय आहे जमेच्या बाजू

• 'मास लीडर म्हणून अख्ख्या मतदारसंघासह राज्यात ओळख• लेवा समाजासह इतर मतदारांवरही चांगला दबदबा• मतदारांच्या समस्यांची जाण, जबरदस्त वक्तृत्व व राजकारणाचा दीर्घ अनुभव

काय आहेत कच्चे दुवे

• भाजपाच्या तुलनेने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मतदारसंघात कमी असलेले संघटनप्रकृती अस्वास्थ्यामुळे पूर्ण मतदारसंघात फिरणे कठीण• विविध वादांमुळे आले आहेत अडचणीत

- शिरीष चौधरी

काय आहे जमेच्या बाजू

• रावेर विधानसभेत दोनवेळा राहिले आहेत आमदार• लेवा समाजावर चांगली पकड• सुसंस्कृत चेहरा, वादापासून दूर

काय आहेत कच्चे दुवे.

• रावेर विधानसभा क्षेत्र वगळता इतर तालुक्यांमध्ये कमी संपर्क• काँग्रेस पक्ष म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघात मजबूत संघटनेचा अभाव

- अॅड. रवींद्र पाटील 

काय आहे जमेच्या बाजू

• सहकारच्या राजकारणाचा तगडा अनुभव भाजपकडून लेवा • समाजाचा उमेदवार राहिल्यास, मविआचा मराठा चेहरा • स्वच्छ प्रतिमा

काय आहेत कच्चे दुवे

• प्रभावी वक्तृत्वाचा अभाव व मतदारसंघात फारसा संपर्क नाही •कार्यकर्त्यांचे जाळे नाही• सहकारमध्ये तगडा अनुभव असला, तरी मोठ्या निवडणुकांमध्ये अनेकवेळा झाला पराभव

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा