पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यास ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 06:25 PM2019-05-08T18:25:09+5:302019-05-08T18:26:19+5:30

विवरे बुद्रूक लग्नातील शिळे अन्न खाल्ल्यानंतर शेळ्या व मेंढ्या मृत्युमुखी पडण्याचे सत्र सुरू असतानाच पशुवैद्यकीय यंत्रणेकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. यामुळे संतप्त झालेल्या काही पशुपालकांनी बुधवारी सकाळी थेट पशुवैद्यकीय दवाखान्यालाच कुलूप ठोकले.

Locks locked by cattle mills in veterinary hospital | पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यास ठोकले कुलूप

पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यास ठोकले कुलूप

Next
ठळक मुद्देरावेर तालुक्यातील विवरे बुद्रूक येथील घटनाश्रेणी एकचा दवाखाना असतानाही प्रतिसादाअभावी संताप

विवरे, ता.रावेर, जि.जळगाव : विवरे बुद्रूक लग्नातील शिळे अन्न खाल्ल्यानंतर शेळ्या व मेंढ्या मृत्युमुखी पडण्याचे सत्र सुरू असतानाच पशुवैद्यकीय यंत्रणेकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. यामुळे संतप्त झालेल्या काही पशुपालकांनी बुधवारी सकाळी थेट पशुवैद्यकीय दवाखान्यालाच कुलूप ठोकले.
रावेर तालुक्यातील विवरे बुद्रूक येथील पशुवैद्यकीय दवाखाना सलाईनवर असल्याची पशुपालकांची भावना आहे. हा दवाखाना श्रेणी एकचा दवाखाना आहे. मात्र या ठिकाणी पशुवैद्यकीय यंत्रणेकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही.
विजय पुराणे यांच्या गरोदर गायीचा मंगळवारी गर्भपात झाला व गायीने एका वासराला जन्म दिला. जन्म दिल्यानंतर गायीच्या पोटातून जाळ न निघाल्याने बुधवारी सकाळपासून त्या गायीला अस्वस्थ वाटू लागले. दुर्दैवाने या वासराचा मृत्यू झाला. याआधी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सकाळपासून फोन करून कळविण्यात येत होते. त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, असा पशुपालकांचा आरोप आहे.
यादरम्यान रावेर येथून तातडीने डॉक्टर बोलवून त्या गायीवर उपचार करण्यात केले. यामुळे गायीला तरी जीवदान मिळाले, असे पशुपालकांनी सांगितले.
याआधी लग्नातील शिळे अन्न एका शेतात टाकलेले होते. ते शेळ्या व मेंढ्यांनी खाल्ले. यातून पहिल्या दिवशी आठ, दुसºया दिवशी १० आणि तिसºया दिवशी मंगळवारी पाच शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाला. या तीनपैकी केवळ एकच दिवस पशुवैद्यकीय यंत्रणा उपचारासाठी घटनास्थळी दाखल झाली. नंतरचे दोन दिवस मात्र पशुवैद्यकीय यंत्रणेकडून प्रतिसाद मिळाला नाही, असे पशुपालकांचे म्हणणे आहे. शेळ्या-मेंढ्यांच्या उपचारासाठी केलेली दिरंगाई आणि गायीच्या गर्भपातानंतर उपचार करण्यासाठी बोलवूनही पशुवैद्यकीय दवाखान्यातील यंत्रणा आली नाही. यामुळे संतप्त झालेल्या पशुपालकांनी बुधवारी सकाळी थेट पशुवैद्यकीय दवाखान्यालाच कुलूप ठोकून आपला निषेध व्यक्त केला.

 

Web Title: Locks locked by cattle mills in veterinary hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.