काकरदा आरोग्य केंद्राला ठोकले कुलूप
By Admin | Updated: October 19, 2015 00:05 IST2015-10-19T00:05:05+5:302015-10-19T00:05:05+5:30
नंदुरबार : सर्पदंश झालेल्या बालिकेला वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे वेळेवर उपचार मिळू शकला नाही. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. संतप्त गावक:यांनी काकरदा येथील आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले.

काकरदा आरोग्य केंद्राला ठोकले कुलूप
नंदुरबार : सर्पदंश झालेल्या बालिकेला वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे वेळेवर उपचार मिळू शकला नाही. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे संतप्त गावक:यांनी काकरदा, ता.धडगाव येथील आरोग्य केंद्राला कुलूप ठोकल्याची घटना रविवारी घडली. संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचा:यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. काकरदा येथील अर्चना भीमराव वळवी (चार वर्ष) या बालिकेला सर्पदंश झाल्याने शनिवारी सायंकाळी तिला काकरदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे केवळ शिपाई उपस्थित होता. वैद्यकीय अधिकारी किंवा इतर कुणीही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. त्यामुळे नातेवाइकांनी बालिकेला उपचारासाठी म्हसावद ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. परंतु तेथे असलेल्या रुग्णवाहिकेचा चालकदेखील उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे खाजगी वाहनाने बालिकेला म्हसावद येथे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु अध्र्या रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. जर बालिकेला काकरदा येथेच वेळेवर उपचार मिळाले असते तर तिचा जीव वाचला असता. गेल्या दोन महिन्यात अशा प्रकारची ही चौथी घटना आहे. चार जणांना वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या गावक:यांनी काकरदा आरोग्य केंद्राला सरळ कुलूप ठोकत निषेध व्यक्त केला. जोर्पयत संबंधितांवर कारवाई होत नाही, तोर्पयत कुलूप उघडणार नाही, असा पवित्रा गावक:यांनी घेतला. तसे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही कळविण्यात आले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.कांतीलाल टाटिया यांनी सांगितले. दरम्यान, काकरदासह इतर अनेक ठिकाणच्या आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी स्थानिक ठिकाणी राहत नाही. शनिवार व रविवारी नेहमीच आरोग्य केंद्रांमध्ये कुणीही सापडत नाहीत. त्यामुळे अनेकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागत आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणीही संतप्त गावक:यांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले आहे. त्यात संबंधितांवर कारवाई होत नाही तोर्पयत कुलूप न उघडण्याचा इशारा या निवेदनात सरपंचांसह गावक:यांकडून देण्यात आला आहे.