बंद घराचे कुलूप तोडून ३३ हजाराचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 17:42 IST2019-04-27T17:41:42+5:302019-04-27T17:42:15+5:30
चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील घटना

बंद घराचे कुलूप तोडून ३३ हजाराचा ऐवज लंपास
चाळीसगाव- तालुक्यातील तळेगाव येथे बंद घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण ३३ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव येथील लताबाई पुरूषोत्तम सोनार यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाटामधून १५ हजार रुपए रोख, १७ हजार रुपए किंमतीची सोन्याची ११ ग्रॅम वजनाची पोत, १५०० रुपए किंमतीचा मिक्सर असा एकूण ३३ हजार ५०० रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना २६ रोजी रात्री ३ वाजता घडली. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक महेंद्र साळुंखे करीत आहे.