दसेगाव जि.प.शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 18:06 IST2018-04-06T18:06:44+5:302018-04-06T18:06:44+5:30

४५ मुलांसाठी एकच शिक्षक: शिक्षण सेवकाची झाली बदली

Locals locked in Dasegaon Zilla Parishad school | दसेगाव जि.प.शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

दसेगाव जि.प.शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

ठळक मुद्देशाळेला दुसराही शिक्षक मिळावा या मागणीवर ग्रामस्थ ठामकेंद्र प्रमुख व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा यांनी शाळेला भेट देऊन ग्रामस्थांचे म्हणणे ऐंकून घेतले.इयत्ता पहिली ते चौथी या वर्गांची पटसंख्या ४५ आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव, दि. ६ : दसेगाव जि.प.शाळेत शिक्षकांची नियुक्ती करावी तसेच विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवारी शाळेला कुलूप ठोकत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दसेगाव जि.प. शाळेत दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहे. मात्र वर्षभरापासून या ठिकाणी एकच शिक्षक इयत्ता १ ली ते ४ थीचे वर्ग सांभाळत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकांच्या संतापाचा कडेलोट झाला. शुक्रवारी संतप्त पालकांनी सकाळी शाळेला कुलूप ठोकत आंदोलानाचा पावित्रा घेतला. इयत्ता पहिली ते चौथी या वर्गांची पटसंख्या ४५ आहे. गेल्या वर्षापासून योगिता राणे या एकमेव शिक्षिका विद्यार्थ्यांना अध्यापन करतात. वर्षभरापूर्वी येथे सचिन उन्हवणे यांची शिक्षण सेवक म्हणून नियुक्ति झाली होती. मात्र नंतर त्यांची बदली तामसवाडी शाळेत झाली. शिक्षकांची रिक्तपदे तत्काळ भरण्यात यावी याबाबत वेळोवेळी पं.स.च्या शिक्षण विभागाकडे कैफियत मांडूनही शिक्षक न मिळाल्याने शुक्रवारी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. शाळेला कुलूप ठोकल्याचे समजातच केंद्र प्रमुख लखीचंद कुमावत व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मनिषा बापू झोडगे यांनी शाळेला भेट देऊन ग्रामस्थांचे म्हणणे ऐंकून घेतले. ग्रामस्थ मात्र शाळेला दुसराही शिक्षक मिळावा. या मागणीवर ठाम आहे.

Web Title: Locals locked in Dasegaon Zilla Parishad school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.