जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्षेत्रात 26 रोजी स्थानिक सुट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 11:46 IST2017-12-23T11:42:42+5:302017-12-23T11:46:43+5:30
26 डिसेंबर रोजी मतदान

जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्षेत्रात 26 रोजी स्थानिक सुट्टी
ठळक मुद्देउद्योग, उर्जा व कामगार विभाग निवडणूक क्षेत्रातील सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, इत्यादींना ही सुट्टी लागू 99 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 23- राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार जिल्ह्यातील 99 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 26 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. हा दिवस कार्यालयीन कामकाजाचा दिवस असल्याने यादिवशी नागरीकांना सार्वत्रिक निवडण
ुकीसाठी मतदान करता यावे, याकरीता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.
उद्योग, उर्जा व कामगार विभाग निवडणूक क्षेत्रातील सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, इत्यादींना ही सुट्टी लागू राहील.