शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कर्जबाजारी शेतकऱ्याची तापी नदीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:43 PM

तरंगताना आढळला मृतदेह

जळगाव : तालुक्यातील भोकर येथील फुलचंद ताराचंद सोनवणे (वय-६९) या कर्जबाजारी शेतकºयाने गावाजवळीलच तापी नदीत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे ५़३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे़ या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़फुलचंद सोनवणे हे भोकर येथे पत्नी व आई भिकूबाई यांच्यासह वास्तव्यास होते़ त्यांना सुनील आणि बापू हे दोन मुलं असून दोघे नाशिक येथे एका कंपनीत कामाला आहे़ फुलचंद यांनी गावातच सहा एकर शेती आहे़ शेती करून ते आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करित होते़ दरम्यान, डोक्यावर सोसायटीच्या साडे तीन लाख रूपयांचा कर्जाचा डोंगर असल्यामुळे ते काही दिवसांपासून मानसिक तणावात होते़ दरम्यान, गुरूवारी पत्नी नाशिक येथे मुलांकडे गेली असल्यामुळे घरी फुलचंद व त्यांच्या आई होत्या़ गुरूवारी मध्यरात्री १२़३० वाजेच्या सुमारास ते आई भिकूबाई यांना शौचास जावून येतो सांगून घराबाहेर निघाले़ त्यानंतर गावाजवळ असल्यामुळे तापी नदीत त्यांनी आत्महत्या केली़रात्री शोधा-शोध सुरूमुलगा फुलचंद हा अर्धा ते एक तास झाला अद्याप घरी आला नाही म्हणून जवळच राहत असलेल्या दुसरा मुलगा राघव व पुतण्या पुंडलिक यांना भिकूबाई यांनी बोलवून फुलचंद यांचा शोध घेण्यास सांगितले़ रात्रभर शोध घेतल्यानंतर राघव यांना शुक्रवारी पहाटे ५़३० वाजेच्या सुमारास फुलचंद यांचा मृतदेह तापी नदीत तरंगताना आढळून आला़ त्यांनी त्वरित मृतदेह नातेवाईकांच्या मदतीने बाहेर काढून जिल्हा रूग्णालयात नेले़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती फुलचंद यांना मृत घोषित केले़ रूग्णालयात ग्रामस्थांसह नातेवाईकांची एकच गर्दी झालेली होती़ याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव