शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

वीजचोरीमुळे निम्म्या जळगावात भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 10:34 IST

Jalgaon : महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच राज्यातील ज्या फिडरवर ६० टक्क्यांपेक्षा जास्त हानी होत आहे.

जळगाव : महावितरणचे जळगाव शहरात एकूण ३७ फिडर आहेत. त्यातील २० टक्के फिडरवर ६० टक्क्यांपेक्षा जास्त वीज हानी होते. तर उरलेल्या १७ फिडरवरदेखील मोठी वीजहानी होत आहे. औद्योगिक वसाहत परिसरासह संपूर्ण जळगाव शहरात ४० टक्के आणि औद्योगिक वसाहत परिसर वगळता इतर शहरात घरगुती आणि व्यापारी कनेक्शनसह एकूण ६० टक्के वीज हानी होत आहे. 

महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच राज्यातील ज्या फिडरवर ६० टक्क्यांपेक्षा जास्त हानी होत आहे. त्या फिडरवर वीज बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यामुळे शहरासह तालुक्यातील अनेक भागांमध्ये तासनतास वीज बंद केली जात आहे. शहरातील गेंदालाल मिल, शिवाजी नगर, समता नगर, हुडको आणि जुने जळगाव भागातील फिडरवर सर्वात जास्त वीज चोरी होत आहे.

जळगाव शहरात एकूण ३७ फिडर आहेत. संपूर्ण शहरात ६० टक्के वीजहानी होते. यात आकडे टाकून चोरी करणे, मीटरलाच बायपास करून वीज वापरणे, मीटरमध्ये छेडछाड करणे यासह अनेक कारणे आहेत. वीजचोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याने सध्या भारनियमनदेखील केले जात आहे. शहरातील १७ फिडरवर ६० टक्क्यांपेक्षा कमी वीजहानी होत आहे.

नियमित बिल भरणाऱ्यांच्या माथी अतिरिक्त सुरक्षा अनामतमहावितरणने गेल्या काही दिवसांपासून अनेक ग्राहकांना नव्याने अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम भरण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. वीज कनेक्शन घेताना जर कमी भार नोंदवला असेल आणि त्यापेक्षा जास्त वीज वापरली जात असेल तर महावितरण पुन्हा नव्याने अतिरिक्त सुरक्षा अनामत रकमेची मागणी करत आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरातील नागरिकांना मेपर्यंत ही अतिरिक्त सुरक्षा रक्कम भरण्याच्या नोटिसा दिल्या जात आहेत. आधीच भारनियमनाने वैतागलेल्या नागरिकांमधून या सुरक्षा अनामतीच्या रकमेमुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहरात वीज चोरी मोठ्या प्रमाणात होते. त्यात आकडे टाकून वीज चोरी केली जाते, तसेच मीटरमध्ये छेडछाड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. वीज चोरी रोखणे हाच त्यावर एक उपाय आहे. शहरातील प्रत्येक फिडरवर वीज चोरी होते. राज्यभरात जळगावात सर्वात जास्त वीज चोरी केली जाते. २० फिडरवर ६० टक्क्यांपेक्षा जास्त वीज हानी आहे.- रमेश पवार, कार्यकारी अभियंता, जळगाव शहर.

टॅग्स :Jalgaonजळगाव