जिवंत व्यक्ती कागदावर मयत!
By Admin | Updated: November 25, 2015 01:09 IST2015-11-25T01:09:47+5:302015-11-25T01:09:47+5:30
नंदुरबार : जिवंत व्यक्तीला मयत दाखवून विमा कंपनीची नऊ लाख 35 हजार रुपयांत फसवणूक करण्यात आल्याची घटना तालुक्यातील रनाळे व मुंबई येथे घडली.

जिवंत व्यक्ती कागदावर मयत!
नंदुरबार : जिवंत व्यक्तीला मयत दाखवून विमा कंपनीची नऊ लाख 35 हजार रुपयांत फसवणूक करण्यात आल्याची घटना तालुक्यातील रनाळे व मुंबई येथे घडली. याप्रकरणी विमा कंपनीच्या एजंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, पुणे (हडपसर) येथील रिलायन्स विमा कंपनीचे फिल्ड ऑफिसर हनुमंत अभिमान साळुंखे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एजंट धनंजय शिवाजी मोरे (वय 32) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिलायन्स इन्शुरन्स कंपनीचे मुंबईस्थित एजंट धनंजय शिवाजी मोरे (वय 32) यांनी विमा कंपनीची रक्कम देताना जिवंत व्यक्ती ही मयत असल्याचे दाखविले व मयताच्या नावे नऊ लाख 35 हजार रुपये विम्याची रक्कम मंजूर केली.
एजंटाने हा प्रकार रकम हडप करण्यासाठी केला. त्यासाठी कागदांवर विमाधारकाला मृत दाखविले. त्यासाठी खोटे रेकॉर्ड तयार करून कंपनीची फसवणूक केली.
एजंट धनंजय शिवाजी मोरेविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 420 (अ) नुसार नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिरसाठ तपास करीत आहेत.