जियो और जीने दो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 12:36 IST2019-11-01T12:36:32+5:302019-11-01T12:36:58+5:30
माणसाने जन्माचा उपयोग स्वत:बरोबर दुस-यांच्या कल्याणाकरीता केला पाहिजे. माणसाने जियो और जीन दो... चा अवलंब केल्यास मानवासह इतर सर्व प्राणी सुखी होतील.

जियो और जीने दो...
सन्मतीवाणी
मनुष्य जन्म मिळणे दुरापास्त आहे. आपल्याला जो मनुष्य जन्म मिळाला त्याचा सदुपयोग करावा. माणसाने जन्माचा उपयोग स्वत:बरोबर दुस-यांच्या कल्याणाकरीता केला पाहिजे. माणसाने जियो और जीन दो... चा अवलंब केल्यास मानवासह इतर सर्व प्राणी सुखी होतील.
चातुर्मास कालावधी संपत आला आहे. या राहिलेल्या दिवसांचा सदुपयोग करुन घ्यावा. जीनवाणी ऐकण्याचा प्रयत्न करावा. भाग्य असेल तरच संतसंगतीचा लाभ मिळू शकतो. संतवाणी शिवाय ज्ञान मिळत नाही. पुण्यकर्म करुन जीवन सुखी करा. जोपर्यंत माणूस स्वत:ला सुंदर बनवित नाही तोपर्यंत जगाचे चित्र आपल्याला सुंदर बनविता येणार नाही. स्वत:ला पुण्यवान बनवा तसेच स्वत:मधील दुर्गुण कमी करुन चांगले बनण्याचा प्रयत्न करा. जो स्वत:बरोबर दुसºयांच्या हिताचा, कल्याणाचा विचार करतो तो खरा विवेकी माणूस आहे. जीवनात संयम, विवेकाला महत्व आहे. माणसाने स्वत:पुरते पाहण्याची वृत्ती बदलली पाहिजे. पुण्य कर्म करण्यासाठी काळ वेळ पहावयाची गरज नाही. पुण्याचा संचय केला तरच सर्व काही प्राप्त होते. ज्यांचे पुण्य प्रबळ असते त्यांचा पापांचा भार कमी होतो. ज्यांचे पुण्य बलवान असते, त्यांच्या केसाला सुध्दा कोणी धक्का लावू शकणार नाही. पापी माणसाची समाजात निंदा होते. विवेकी व्यक्ती संघर्षाला तोंड देऊ शकते. जिओ और जीने दो.. हा महावीरांचा संदेश मानवजातीपुढे आदर्श आहे.
- पू. श्री. सन्मती महाराज