पावसाने विश्रांती घेतल्यानंतर विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 09:50 PM2020-09-07T21:50:20+5:302020-09-07T21:51:17+5:30

रात्री-अपरात्री विज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार

Lightning strikes after the rain has taken a break | पावसाने विश्रांती घेतल्यानंतर विजेचा लपंडाव

पावसाने विश्रांती घेतल्यानंतर विजेचा लपंडाव

Next

जळगाव : गेल्या आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी शहरात अद्यापही रात्री-अपरात्री विज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून पावसाळ््यात लोडशेडींग नसले तरी, तांत्रिक कारणामुळे विज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार अनेकदा घडले. सुरूवातीला वादळामुळे एक ते दीड महिना विज तारा तुटण्याचे प्रकार घडुन तासनतास विज पुरवठा खंडित होत होता. त्यानंतरही जोराने पाऊस आल्यावर शहरातल्या कुठल्या ना कुठल्या भागात विज पुरवठा खंडित होण्याच प्रकार सुरूच होता. आता पावसाने विश्रांती घेऊन आठवडा उलटला आहे. मात्र, अद्यापही शहरातील विजेची समस्या सुटलेली नाही. दररोज कुठल्या ना कुठल्या तास-दीड तास विज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याच्या नागरिकांतर्फे तक्रारी करण्यात येत आहेत. पावसाने विश्रांती घेतल्याने, तापमानात वाढ झाली असून दिवसा मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनचं उन्हाळ््याप्रमाणे विविध वातानुकूलीत उपकरणे वापरायला सुरूवात केली आहे. असे असतांना आता पावसाळ््याप्रमाणे विज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार शहरात घडत आहेत.
या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी, तांत्रिक कारणामुळे ब्रेक डाऊन होऊन विज पुरवठा खंडित होत असल्याचे कारण सांगितले.

Web Title: Lightning strikes after the rain has taken a break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव