कोरोनाच्या चौफेर विळख्याने रावेर तालुक्याचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 04:41 PM2020-05-17T16:41:59+5:302020-05-17T16:42:49+5:30

ई-पास घेऊन येणाऱ्यांकडे वैद्यकीय दाखले असले तरी त्यांना संस्थात्मक विलगीकरण करावे

The life of Raver taluka was hanged due to the chauffeur of Corona | कोरोनाच्या चौफेर विळख्याने रावेर तालुक्याचा जीव टांगणीला

कोरोनाच्या चौफेर विळख्याने रावेर तालुक्याचा जीव टांगणीला

googlenewsNext
ठळक मुद्देरावेर : बºहाणपूरला ११० जण व फैजपूरलाही एक जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने नागरिक चिंताग्रस्तई-पास घेऊन येणाऱ्यांकडे वैद्यकीय दाखले असले तरी त्यांना संस्थात्मक विलगीकरण करावे

किरण चौधरी
रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील चोरवड मध्य प्रदेश सीमेपलीकडे असलेल्या बºहाणपूर शहरात नव्याने १४ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कोरोना रूग्णांची संख्या ११० वर पोहोचली आहे. याशिवाय फैजपूर व यावल शहरात दोन रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तर यापूर्वीच खरगोन जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने तालुक्याला कोरोनाने चौफेर बाजूने विळखा घातला आहे.
तालुक्याच्या सीमेपासून अवघ्या १२ कि.मी.अंतरावरील बºहाणपूर शहरात १४ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यामुळे बºहाणपूर शहर व परिसराने आता कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांनी शतक पार करून ११०चा पल्ला गाठला आहे. रास्तीपुरा भाग कोरोनाचे केंद्रबिंदू ठरले आहे. एकट्या रास्तीपुरा भागातून आतापर्यंत १८ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून जिल्हा प्रशासनाचा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसरत सुरू आहे.
तालुक्याच्या चोरवड व मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड सीमा तपासणी नाक्यांपासून बºहाणपूर जिल्ह्यात कोरोनाचे भयावह वादळ घोंघावत असतांना पश्चिमेकडील यावल तालुक्याच्या सीमेवरील फैजपूर शहरात व यावल शहरातही कोरोनाने पाय पसरले आहेत.
तसेच तालुक्याच्या दक्षिणेला असलेल्या भुसावळ तालुक्यात तर उत्तरेला खरगोन जिल्ह्यात कोरोनाने कहर घातला आहे. तालुक्याच्या चौफेर कोरोनाने विळखा घातला असून तालुक्याचा जीव वेशीला टांगला आहे. रावेर शहरासह ग्रामीण भागात कसला कोरोना? की काय होतेय? अशा आत्मघाती आत्मविश्वासाने स्वैराचार करणाºया समाजकंटकांनी जराही चुकीचे पाऊल टाकले तर त्याचे प्रायश्चित्त सबंध तालुक्याला भोगावे लागू शकते.

ई-पास घेऊन येणाऱ्यांकडे वैद्यकीय दाखले असले तरी त्यांना संस्थात्मक विलगीकरण करावे
कोरोनाचे निदान स्वॅब तपासणी अहवालाखेरीज होत नाही. केवळ इन्फ्रारेड थमार्मीटरने व बाह्य लक्षणांवरून प्रवासासाठी पात्र असल्याचे वैद्यकीय दाखले दिमतीला घेऊन, गावाबाहेरील शाळांमध्ये संस्थात्मक विलगीकरणास विरोध करून थेट गावात व त्यांच्या घरकुटूंबात प्रवेश करतात. यामुळे कोरोनाचा सामाजिक प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी ग्रामीण भागातील जनतेतून बाहेरील राज्य तथा बाहेरील जिल्ह्यातून येणाºया नागरिकांना ग्रामीण भागात विरोध दर्शवला जात आहे. तथापि, गावातील राजकारणाची चक्र गतिमान करून अशा बाहेरून येणाºया लोकांना पाठीशी घातले असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यासंबंधी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन बाहेरून ई पासेस घेऊन येणाºयांना सक्तीने संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी तातडीचे निर्देश द्यावेत व ज्या ज्या ग्रा.पं.पदाधिकाºयांकडून ग्रामस्थांची मागणी फेटाळून त्यांना पाठीशी घातले जात असेल त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: The life of Raver taluka was hanged due to the chauffeur of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.