शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

जामीन दिल्याच्या बदल्यात जळगावात हवालदाराने मागितली लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:13 PM

वॉरंटमध्ये जामिनावर सोडल्याच्या बदल्यात पाच हजाराची मागणी करणाºया एमआयडीसी पोलीस स्टेशनचा हवालदार दयाराम देवराम महाजन (वय ४७, रा.पोलीस हौसिंग सोसायटी, शाहू नगर, जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री ९.३० वाजता जिल्हा रुग्णालयातून अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनलाच महाजन याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे जिल्हा रुग्णालयात पोलिसाला अटक एसीबीची कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशनचा कर्मचारी

जळगाव : वॉरंटमध्ये जामिनावर सोडल्याच्या बदल्यात पाच हजाराची मागणी करणा-या एमआयडीसी पोलीस स्टेशनचा हवालदार दयाराम देवराम महाजन (वय ४७, रा.पोलीस हौसिंग सोसायटी, शाहू नगर, जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री ९.३० वाजता जिल्हा रुग्णालयातून अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनलाच महाजन याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे वडील व काका यांच्याविरुध्द जुन्या गुन्ह्याचे वॉरंट होते. या वॉरंटमध्ये महाजन यांनी दोघांना जामीन दिला होता. त्यामुळे महाजन यांनी तक्रारदाराकडे १७ आॅक्टोबर रोजी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत महाजन यांनी लाच मागितल्याचे सिध्द झाले. जिल्हा रुग्णालयात रचला सापळामहाजन यांची सोमवारी जिल्हा रुग्णालयात रात्रपाळीची ड्युटी होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक निलेश लोधी व सहका-यांनी घरापासूनच महाजन यांच्यावर नजर ठेवली होती. जिल्हा रुग्णालयाच्या चौकीत येताच पथकाने महाजन यांना ताब्यात घेतले. तेथून महाजन यांना एमआयडीसी पोलीस स्टेशनला लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, लाचेची मागणी करणाºयांविरुध्द तक्रार करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांनी केले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी