शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

बोगस खताचा पुरवठा करणाऱ्या ‘सरदार’चा परवाना पाच वर्षासाठी निलंबित; कृषी विभागाचे आदेश 

By सुनील पाटील | Updated: July 18, 2023 18:40 IST

या आदेशामुळे या कंपनीला महाराष्ट्रात खत विक्री करता येणार नाही.

जळगाव : सिंगल सुपर फॉस्फेट हे रासायनिक खत पुरवठा करणाऱ्या सरदार ॲग्रो फर्टिलायझर ॲंड केमिकल्स प्रा.लि.(भालगम, ता.वांकनर, जि.मोरबी, गुजरात) या कंपनीचा परवाना पाच वर्षासाठी निलंबित करण्यात आला आहे. राज्याचे कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रक) यांनी हे आदेश काढले आहेत. या आदेशामुळे या कंपनीला महाराष्ट्रात खत विक्री करता येणार नाही.

जामनेर तालुक्यातील तोंडापूर, मोयखेडा दिगर, तोरनाळे तसेच जळगाव तालुक्यातील वडली यासह इतर गावांमध्ये शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कापसात ‘सरदार’च्या उत्पादीत सिंगल सुपर फॉस्फेट या खतामुळे पिकांची वाढ खुंटणे, पाने गोळा होणे, पाने निमुळती, जाडसर व लांबट होऊन शिरा फुगीर असे दुष्परिणाम जाणवू लागल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. कृषी विभागाने प्रशासकीय अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी, खत विक्रेते व विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांच्या उपस्थित पिकांची पाहणी करुन पंचनामा केला. ज्या शेतकऱ्यांनी या खताचा वापर केलेला नाही, तेथील पिकांची देखील यावेळी पाहणी करण्यात आली. सदरचे खत भेसळ व निकृष्ट दर्जाचे असल्याचा निष्कर्ष काढला. २८५ शेतकऱ्यांनी या खताचा वापर केलेला आहे. या खताचे नमुने घेऊन ते नाशिक प्रयोगशाळा व हैदराबाद येथे पाठविण्यात आलेले आहेत.

जळगावातील पुरवठादाराकडून उल्लंघन सरदार ॲग्रो फर्टिलायझर ॲंड केमिकल्स प्रा.लि. या कंपनीचा जळगावातील पिंप्राळा येथील विक्रेत्याने खत नियंत्रण आदेश व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ (२) (१),९ चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे तसेच कंपनीच्या उत्पादीत खतामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे कृषी विभागाने १५ फेब्रुवारी २०२८ पर्यंत परवाना निलंबित केला आहे. कृषी आयुक्तांकडे अपिलसाठी ३० दिवसाची मुदत कंपनीला देण्यात आलेली आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी