शिक्षकाकडून शाळेच्या ग्रंथालयास ग्रंथसंपदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:15 IST2021-09-25T04:15:28+5:302021-09-25T04:15:28+5:30
या पुस्तिका देण्यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी तसेच मोबाइल युगात वाचन संस्कृती जवळ जवळ नाहीशी होत ...

शिक्षकाकडून शाळेच्या ग्रंथालयास ग्रंथसंपदा
या पुस्तिका देण्यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी तसेच मोबाइल युगात वाचन संस्कृती जवळ जवळ नाहीशी होत आहे म्हणून पुस्तके वाचून विद्यार्थीवर्गास अधिक ज्ञान मिळावे असा आहे. यामुळे विद्यार्थी स्वावलंबी बनेल असे शरद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यात विविध लेखकांच्या पुस्तकांच्या माध्यमातून पुढील विद्यार्थी चांगल्या पद्धतीने वाचन करेल त्याच्या ज्ञानामध्ये अधिक भर पडेल, असे गौरवोद्गार सरिता देशमुख यांनी काढले. सदर पुस्तिका शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता देशमुख यांनी स्वीकारून पुस्तिका दिल्याबद्दल शरद पाटील यांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास शाळेतील उपशिक्षक जितेंद्र पवार, शोभा बेहेरे, ललिता सूर्यवंशी, वैशाली पाटील, दीपक पाटील, गोरख पाटील, उमाकांत पाटील उपस्थित होते.
२५/३