शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

एल.एच.पाटील स्कूलने बांधकाम परवानगीसाठी सादर केले खोटे शपथपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 14:42 IST

शहरातील शिरसोली रस्त्यालगत असलेल्या मेहरूण शिवारातील गट ३५६ वर एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या बांधकाम परवानगीसाठी संस्थाध्यक्षांनी मनपाच्या नगररचना विभागात खोटे शपथपत्र सादर करून अस्तित्वात नसलेला रस्ता दाखवून परवानगी घेतली आहे.

ठळक मुद्देदिशाभूल : एल.एच.पाटील शाळेच्या संस्थाचालकाचा प्रतापआमदार पटेल यांच्या निधीतून मंजूर केला रस्ता‘नो डेव्हलपमेंट’ झोनमध्ये बांधकामास दिली परवानगी

अजय पाटील ।जळगाव : शहरातील शिरसोली रस्त्यालगत असलेल्या मेहरूण शिवारातील गट ३५६ वर एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या बांधकाम परवानगीसाठी संस्थाध्यक्षांनी मनपाच्या नगररचना विभागात खोटे शपथपत्र सादर करून अस्तित्वात नसलेला रस्ता दाखवून परवानगी घेतली आहे. नगरसेवक प्रशांत नाईक यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून, त्यांनी याबाबत मनपा नगररचना विभागाकडे तक्रार केली आहे. दरम्यान, याप्रकरणी नगररचना विभागाचे सहायक संचालक अनंत धामणे यांनी या शाळेचा आराखडा तयार करणारे आर्किटेक्ट प्रकाश गुजराथी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थाध्यक्षांनी शाळेची बांधकाम परवानगी घेताना मनपा नगररचना विभागाला आराखडा सादर करताना, शिरसोली रस्त्यालगत शाळेपर्यंत १८ मीटरचा रस्ता तयार करून घेण्याबाबत १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र सादर केले. तसेच या शपथपत्रात शाळेपर्यंत १८ मीटरचा रस्ता विकसित करण्याचे आश्वासन दिले. त्या आधारावरच मनपा नगररचना विभागाने या शाळेच्या बांधकामाला परवानगी दिली. मात्र, नाईक यांच्या तक्रारीनुसार या ठिकाणी कुठलाही रस्ता अस्तित्वात नसतानाही हा रस्ता विकसित करण्यासंदर्भात संस्थाध्यक्षांनी मनपा प्रशासनाची दिशाभूल केली असल्याचे म्हटले आहे.रस्त्याच्या बांधकामापूर्वी शाळेच्या बांधकामासाठी का दिली परवानगी?नगररचना विभागाने या शाळेच्या बांधकामासाठी परवानगी घेताना, आधी रस्त्याचे बांधकाम करणे गरजेचे होते. मात्र, ते बांधकाम न करताच नगररचना विभागाने बांधकामाला केवळ १०० रुपयांच्या स्टॅम्पवर परवानगी कशी दिली? तसेच मेहरूण शिवारात रस्ताच मंजूर नसेल तर शाळा प्रशासनाने १८ मीटरचा रस्ता कसा दाखविला? नगररचना विभागाचे तत्कालीन सहायक संचालक चंद्रकांत निकम यांनी या शाळेच्या बांधकामालाा परवानगी दिली आहे.आमदार पटेल यांच्या निधीतून मंजूर केला रस्ताएकीकडे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था असताना आमदार चंदूलाल पटेल यांनी शहरातील रस्त्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करून २०१७ मध्ये शिरसोली रस्ता ते आदिनाथ हॉटेलपर्यंतच्या रस्त्यासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. बांधकाम विभागाला निधीदेखील प्राप्त झाला होता.शाळेच्या बांधकामाबाबत नाईक यांच्या तक्रारीची माहिती मिळाल्यानंतर चंदूलाल पटेल यांनी हे काम रद्द केले. तसेच हा निधी परत मागवून घेतला होता. मात्र, तरीही बांधकाम विभागाने हा रस्ता तयार केला नसतानादेखील रस्ता तयार झाल्याचे आपल्या कागदपत्रात दाखविले असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची मिलीभगत असल्याचे दिसून येत आहे.आराखडा तयार करणाऱ्या आर्किटेक्टला नोटीसप्रशांत नाईक यांच्या तक्रारीची दखल घेत मनपा नगररचना विभागाने मेहरूण शिवारातील ३५७ गटवर शाळेचा प्लॅन तयार करणाºया प्रकाश गुजराथी यांना ३१ आॅगस्ट रोजी नोटीस बजावली आहे. तसेच गुजराथी यांना यासंदर्भात सात दिवसांच्या आत समर्पक खुलासा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सात दिवसात खुलासा प्राप्त न झाल्यास त्यानंतर त्यांचे काहीएक म्हणणे न ऐकता थेट कारवाई केली जाईल, असा इशारा या नोटीसमधून देण्यात आला आहे.

मनपाने या जागेवर १८ मीटरचा रस्ता दाखविला आहे. त्यामुळे तो गृहीत धरून मनपाला हा रस्ता आम्ही स्वखर्चाने विकसित करून देण्याबाबतचे पत्र सादर केले आहे. प्रशांत नाईक यांची तक्रार चुकीची असून, त्यांचा हेतू साध्य होत नसल्याने त्यांनी ही खोटी तक्रार केली आहे.-एल.एच.पाटील, संस्थाध्यक्ष, एल.एच.पाटील शाळा

टॅग्स :SchoolशाळाJalgaonजळगाव